लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे: येथील नौपाडा, कोपरी, गांधीनगर, हाजुरी आणि लुईसवाडी भागात गढुळ पाण्याचा पुरवठा होत असून या पाण्याला दुर्गंधी येत असल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गढुळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचा दावा करत पालिका प्रशासनाने पाणी उकळून आणि गाळून पिण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
mla ashok pawar son kidnapped
Ashok Pawar: आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून दहा कोटींची खंडणी, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
Woman wash hair with toxic foam in Yamuna river video viral
“अहो ताई, तो शॅम्पू नाही” यमुना नदीत महिलांचा किळसवाणा प्रकार; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी मारला कपाळावर हात
Onion garlic became expensive while the prices of cotton soybeans decreased
ग्राहक, शेतकरी चिंतेत; कांदा, लसूण महागले तर कापूस, सोयाबीनचे दर पडल्याने नाराजी

ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यात महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून २५० दशलक्षलीटर, स्टेम प्राधिकरणाकडून ११५ दशलक्षलीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्षलीटर आणि मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे हे सर्वच स्त्रोत शहरातील पाणी पुरवठ्याच्या दृष्टीकोनातून महत्वाचे मानले जातात.

हेही वाचा… बनावट वाहन क्रमांक वापरुन फिरणाऱ्या वसईतील चालकाला कल्याणमध्ये अटक

मुंबई महापालिकेकडून होणारा पाणी पुरवठ्याचे वितरण नौपाडा, कोपरी, गांधीनगर, हाजुरी आणि लुईसवाडी भागात करण्यात येते. या भागात गेल्या काही दिवसांपासून गढुळ पाण्याचा पुरवठा होत आहे. या पाण्याला दुर्गंधी येत आहे. या दुषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले असून याच मुद्द्यावरून पालिकेच्या कारभारवर नागरिकांकडून टिका होत आहे.

हेही वाचा… डोंबिवलीतील गोग्रासवाडी मधील संथगती काँक्रीट रस्त्याने नागरिक हैराण

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या जल विभागाने दिलेल्या सूचनेनुसार, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यामुळे धरणातून जलवाहिनीत गढूळ पाणी येत आहे. तसेच, पाण्याला वासही येतो आहे. हे पाणी पिसे-पांजरापोळ जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध करण्यात येते. तरीही नागरिकांनी पाणी गाळून आणि उकळून प्यावे, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.