कल्याण शहर परिसरात शनिवारी दुपारी वादळी वाऱ्यांसह विजांच्या गडगडाटात पडलेल्या मुसळधार पावसात रस्त्यावरील नवरात्रोत्सव शुभेच्छांच्या कमानी रस्त्यावर कोसळल्या. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. मात्र जागोजागी वाहतूक कोंडी झाली होती.वाहतूक पोलीस, स्थानिक रहिवाशांनी हस्तक्षेप करुन या कमानी भर पावसात बाजुला करण्याचे काम केले. काही वाहनांना या कमानी कोसळल्या पण वाहनांचे फार नुकसान झाले. एका चारचाकी मोटार, एका ट्रकच्या बाजुला या कमानी कोसळल्या पण या दोन्ही वाहनांचे नुकसान झाले नाही, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा >>> कल्याण मधील वालधुनी येथे बौध्द धर्मगुरुंना ठार मारण्याची धमकी

दुपारी एक वाजता अचानक वादळी वारे सुरू झाले. त्या बरोबर पाऊस सुरू झाला. वादळी वाऱ्यांमुळे रस्त्यांवरील कमानी धडाधड रस्त्यांवर परिसरातील सोसायट्यांच्या आवारात कोसळल्या. पाऊस असल्याने कोणीही रस्त्यावर नसल्याने कमानी कोसळल्याने मुळे कोणाला इजा झाली नाही. कल्याण पूर्व, डोंबिवलीतही अनेक ठिकाणी असे प्रकार घडले. रस्त्यावरुन कमानी काढून टाकल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

Story img Loader