ठाणे: महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले मोठमोठे प्रकल्प परस्पर गुजरातला पळविल्याचा आरोप करत ठाण्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सोमवारी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. ठाणे नगर पोलिस हा पुतळा जप्त करीत असताना पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.

हेही वाचा >>> ६१ दिवसात २५७३ किमी धावण्याचा विक्रम करुन; डोंबिवलीकर तरुणाची गिनिज बुकमध्ये नोंद

हेही वाचा >>> कळव्यात इमारतीचा स्लॅब कोसळून तीन जण जखमी; इमारतीमधील सदनिका खाली करण्याचे पालिकेचे आदेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड,  ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष आनंद परांजपे  यांच्या मार्गदर्शनाखाली  राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष विक्रम खामकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्राचे प्रकल्प पळवणार्‍या गुजरातचा निषेध म्हणून मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा पुतळा जाळण्यात आला. यावेळी कार्यकर्त्याकडून केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, उद्योगाचे विमान गुजरातला बेरोजगारीचे गाजर मराठी तरुणाला” हे धोरण शिदे-फडणवीस सरकारने आखले असून त्यास मोदींचा पाठिंबा आहे. यापुढे जर असे प्रकल्प पळविले तर या सरकारला जनता पळवून लावेल,  असा इशारा विक्रम खामकर यांनी दिला.

Story img Loader