राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना विनयभंग प्रकरणात दिलासा मिळाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कोर्टात धाव घेणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. कोर्टाने १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जितेंद्र आव्हाड यांना जामीन दिला आहे. रिदा रशीद यांनी दिलेल्या तक्रारीवरून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान जामीन मिळाल्यानंतर आव्हाडांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

“मला अजिबात आनंद झालेला नाही. ३५४ चा गुन्हा माझ्या जिव्हारी लागला आहे. संपूर्ण व्हिडीओ पाहिल्यानंतर ती भगिनी समोरुन चालत येताना दिसत आहे. तिच्या मनात हे सगळं ठरलेलं असावं. कारण मी तिला बाजूला केलं नसतं तर ती माझ्या अंगावर पडली असती. नंतर माझ्यावर एक मोठा गुन्हा दाखल झाला असता. पण मला देवाने बुद्धी दिली आणि मी तिला बाजूला केलं. मला अडकवण्यासाठी हे सगळं रचलं होतं. पण देवाने मला वाचवलं,” असं आव्हाड म्हणाले आहेत.

Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?
army man killed his wife for immoral relationship and dead body throw in river
विवाहित सैनिकाचा तरुणीवर जडला जीव… पत्नी अडथळा ठरत असल्याने थेट नदीत…
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना

Jitendra Awhad Anticipatory Bail: जितेंद्र आव्हाडांना मोठा दिलासा, विनयभंग प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर

उद्धाटनाप्रसंगी एखाद्या महिला कार्यकर्त्याला पोलिसांनी हात लावला तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार का? अशी विचारणा जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. मला संपवण्यासाठी ठरवून हे खालच्या पातळीवरील राजकारण झालं असल्याचा गंभीर आरोपही आव्हाडांनी केला आहे.

उद्धाटनाप्रसंगी एखाद्या महिला कार्यकर्त्याला पोलिसांनी हात लावला तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार का? अशी विचारणा जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. मला संपवण्यासाठी ठरवून हे खालच्या पातळीवरील राजकारण झालं असल्याचा गंभीर आरोपही आव्हाडांनी केला आहे.

कोर्टात नेमकं काय घडलं?

जितेंद्र आव्हाड यांच्या वतीने वकील गजानन चव्हाण यांनी बाजू मांडली. घटनास्थळी प्रचंड गर्दी होती असं सांगताना आव्हाड त्या महिलेला बहीण म्हणाले होते अशी माहिती त्यांनी कोर्टात दिली. तसंच महिलेने याआधी दोन पुरुषांना धक्काबुक्की केली होती असा दावा त्यांनी केला. राजकीय हेतूने हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. आव्हाड यांनी त्या महिलेला बहीण मानलं आहे. त्या आव्हाडांपेक्षा खूप लहान आहेत. ते उच्च शिक्षित आहेत, आमदार आहेत. प्रचंड मताने मुंब्रा- कळवा मतदार संघातून विजयी झाले आहेत. त्यांच्याकडून हे कृत्य कसं होईल असा युक्तिवाद वकिलांनी केला.

Jitendra Awhad Court: गर्दीत विनयभंग कसा होऊ शकतो? जितेंद्र आव्हाडांच्या वकिलांचा प्रश्न, न्यायाधीशांना दाखवला व्हिडीओ

फिर्यादी आणि साक्षीदारला प्रभावीत केलं जाऊ शकतं असा युक्तिवाद करत पोलिसांनी अटक करण्याची मागणी केली. यावर आव्हाड यांच्या वकिलांनी हा गुन्हा ३५४ कलमांतर्गत दाखल होऊ शकत नाही असं सांगितलं. तसंच तक्रारदार महिलेला फक्त गर्दीतून बाजूला केलं असं सांगितलं. तेथील पत्रकारांनी गर्दीचे केलेले वार्तांकन यावेळी न्यायाधीशांना दाखवण्यात आलं.

हा गुन्हा होत नाही असं सांगत उच्च न्यायालाच्या ३५४ प्रकरणातील दोन निकालांचाही यात आव्हाड यांच्या वकिलांनी उल्लेख केला. राज्यात सत्ताबदल झाला आहे. त्याच्या बातम्या येत असतात, त्यांचं हे प्रतिबिंब आहे. त्याचा परिणाम जितेंद्र आव्हाड यांना सहन करावा लागला असा युक्तीवाद आव्हाड यांच्या वकिलांनी केला.

दोन दिवसांपूर्वीच प्रेक्षकाला मारहाण प्रकरणात त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यांनी जामिनाच्या अटी-शर्थीचे उल्लंघन केल्याचा दावा पोलिसांनी रिपोर्टमध्ये केला होता. परंतु ते प्रकरण जामीनास पात्र होते, असं आव्हाड यांच्या वकिलांनी सांगितले..

नेमकं प्रकरण काय आहे?

रिदा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वाय जंक्शन येथे रविवारी रात्री एमएमआरडीएने बांधलेल्या एका पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केले गेले. या लोकार्पण कार्यक्रमास आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गाडीत बसून जात असताना रिदा त्यांना भेटण्यासाठी जात होत्या. त्याचवेळी आव्हाड हे समोरून येत होते. त्यांनी विनयभंग करण्याच्या उद्देशाने बाजूला हो, असे म्हणत ढकलले असे तक्रारीत म्हटले आहे.

आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा; आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा; नेत्यांकडून मनधरणी

या घटनेनंतर त्या परिमंडळ एकचे उपायुक्तांना भेटल्या आणि मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आव्हाड यांना एका प्रेक्षकास मारहाण केल्याप्रकरणी अटक झाली होती. त्यानंतर हा दुसरा गुन्हा दाखल झाल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी मुंब्रा बाह्यवळण, मुंबई नाशिक महामार्गावर वाहनांचे टायर जाळून रास्तारोको केला. आव्हाड़ यांनी वकिलांमार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यानंतर न्यायालयाने मुंब्रा पोलिसांना त्यांचे म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते.

रिदा रशीद या कोण आहेत?

जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगचा आरोप करत मुंब्रा पोलीस ठाण्यात तशी तक्रार दाखल करणाऱ्या रिदा रशीद या भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा आहेत. त्या मुंब्रा परिसरात राहत असून यापूर्वी त्या मुंबईतील अंधेरी येथील लोखंडवाला भागात राहत होत्या. त्यांचे पती अजगर रशीद यांची खासगी कंपनी असून त्याचे कार्यालय मुंबईत आहे. रिदा रशीद या मुंब्रा परिसरात सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून काम करीत आहेत. त्या गेल्या काही वर्षांपासून भाजपाचे काम करीत आहेत. त्या २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस कळवा-मुंब्रा मतदारसंघातून भाजपाकडून निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक होत्या. परंतु या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाची युती झाली आणि ही जागा शिवसेनेच्या वाटय़ाला गेली. या मतदारसंघात शिवसेनेने दीपाली सय्यद यांना उमेदवारी दिली होती. पण, त्यांचा निवडणुकीत पराभव झाला.