शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना, धनुष्यबाण वाढीसाठी आयुष्यभर जी मेहनत घेतली होती. ती दोघांच्या भांडण्यात निवडणूक आयोगाने गोठविली. हे खूप क्लेशदायक आहे. वडिलांनी जे कमावले होते ते मुलांनी एका मिनिटांमध्ये घालविले, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शनिवारी येथे व्यक्त केली.
हेही वाचा >>>डोंबिवली : चिन्ह गोठविण्यावरुन मनसेचा शिंदेंना चिमटा तर ठाकरेंचा कैवार
डोंबिवलीतील कल्याणकारी सामाजिक संस्था आयोजित कार्यक्रमासाठी नेते एकनाथ खडसे, रावेरचे काँग्रेस आ. शिरिष चौधरी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. निवडणूक आयोगाने शिवसेना नावाचा वापर, धनुष्यबाण चिन्ह गोठविल्याच्या विषयावर नेते खडसे म्हणाले, शिवसेनेचे सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्याचा ६० वर्षाहून अधिकचा काळ शिवसेना वाढीसाठी, धनुष्यबाण चिन्ह संवर्धनासाठी खर्च केला. धनुष्यबाणाला एक प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली. महाराष्ट्रात धनुष्यबाण म्हणजे शिवसेना अशी परिस्थिती आहे. हे वातावरण निर्माण करण्यात शिवसेनाप्रमुखांचे मोठे योगेदान आहे. परंतु अनेक वर्षाची ही पुण्याई दोघांच्या भांडणामध्ये निवडणूक आयोगाने एक मिनिटात गोठविली.
हेही वाचा >>> ठाणे : शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेला उद्यापासून ठाण्यातून सुरुवात ; यात्रेननिमित्ताने जाहीर मेळाव्याचे आयोजन
वाडवडिलांनी जे कमावले होते ते मुलांनी एक मिनिटात गमावले. हे चिन्ह, पक्ष नाव तात्परते गोठविले असले तरी हे खूप क्लेशकारक आहे, असे खडसे म्हणाले.वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्या त्याचवेळी त्यांच्यावरील गुन्हे मागे घेऊन त्यांची चौकशीतून सुटका होईल असे वाटले. ते खरे ठरले. या प्रकरणाचे भवितव्य आता अंधकारमय आहे. अनेकांप्रमाणे माझेही फोन ६८ दिवस अभिवेक्षण केले जात होते. हे करण्या मागचे कारण काय हे मला आतापर्यंत समजले नाही आणि मागणी करुनही कळविले नाही, असे खडसे यांनी सांगितले.