ठाणे : श्रीमंत दगडू शेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने सहस्त्र ब्राह्मण भोजन कार्यक्रम आयोजित केला असून या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा खोचक सवाल केला आहे. हा छान उपक्रम असल्याचे सांगत कसबा निवडणूक हरल्यामुळे ब्राह्मण भोजन सुचले का, असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.
श्रीमंत दगडू शेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने सहस्त्र ब्राह्मण भोजन कार्यक्रम रविवारी आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचा फलक समाजमाध्यमांवर पोस्ट करत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा खोचक सवाल केले आहेत. फारच छान उपक्रम १ हजार ब्राह्मणांना दगडू शेठ ट्रस्टने भोजन दिले. गणपतीचे दर्शन सगळेच जात समूह घेत असतात, आदर्श घाला नवीन. क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र यांनाही भोजन द्या. ५ हजार वर्षा पूर्वीच्या परंपरा मोडीत काढल्या पाहिजेत, असे त्यांनी म्हटले आहे. कसबा निवडणूक हरल्यामुळे हे ब्राह्मण भोजन सुचले नाही ना, असा प्रशही त्यांनी विचारला आहे.