ठाणे – मला वाटते हे आजचे प्रकरण नाही. मराठी माणूस सहन करतो. त्यामुळेच अशा प्रवृत्तींची हिमंत वाढते. आपण पहिल्यापासून कणखर हिमंत घ्यायला पाहिजे होती, अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तृप्ती देवरुखकर प्रकरणावर बोलताना व्यक्त केली. मतांच्या गणितात हा समूह दुखावेल. तो समूह नाराज होईल, असे राजकीय पक्ष म्हणत गेले अन् त्यातून मराठी माणसाची टक्केवारी कमी होत गेली, असा दावाही त्यांनी केला. भेदभावाचा हा प्रश्न मुंबई पुरता नाही तर सबंध देशाचा आहे. आज देशात जो विद्वेष पसरविला जात आहे. त्याची ही परिणीती आहे, असेही ते म्हणाले. मुलुंडमधील तृप्ती देवरुखकर या मराठी महिलेस घर देण्यास नकार देत असल्याची चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. या संदर्भात तृप्ती यांनी शुक्रवारी जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. त्यानंतर आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा