भाजप देशावर ब्रिटिशांप्रमाणे राज्य करत आहे. भगवा रंग हा त्यागाचे प्रतिक आहे. परंतु या रंगाचा वापर करुन वाटचाल करणाऱ्या भाजपचे हिंदुत्व ढोंगी आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी मंगळवारी येथे केली.

हेही वाचा- कोकण शिक्षकमधील कोण आहेत ज्ञानेश्वर म्हात्रे ?

Consumer centric approach harming interests of farmers
निवडणुकीपुरते  शेतकऱ्यांना चुचकारण्याचे धोरण
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Maharashtra, Delhi Politics, Small State,
लिलीपुटीकरण…
Eknath Shinde, Vijay Shivtare, Purandar Haveli,
पुरंदर विमानतळ ‘असा’ उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा ! विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ घेतली सभा
congress leader rahul gandhi made serious allegations on pm modi in jharkhand
पंतप्रधान बड्या उद्योजकांचे हित जोपासतात; राहुल गांधी यांचा आरोप
Rahul Gandhi ashok chavan nanded
नांदेडमध्ये राहुल गांधींकडून चव्हाण कुटुंबिय बेदखल !
Deputy Chief Minister Devendra Fadnavis announced that will waive off the loans of farmers after mahayuti govt
“शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

महागाई आणि बेरोजगारी विरोधातील जनजागरण यात्रेनिमित्त विद्या चव्हाण कल्याणमध्ये आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी भाजपच्या आताच्या भूमिकेवर सडकून टीका केली. बेरोजगारांना कोट्यवधीच्या नोकऱ्या देणार म्हणून तरुणांना भाजपच्या सरकारने फसविले आहे. हे कमी म्हणून की काय आता देश अदानी, अंबानी यांना विकून टाकण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, अशी टीका चव्हाण यांनी केली. भाजपा सरकारच्या विरोधात कोणी आक्रमक भूमिका घेतली की त्याच्या विरुध्द तात्काळ सीबीआय, ईडीचा ससेमिरा लावला जात आहे. विरोधकांना खच्ची करण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. सामान्य नागरिकांचे महागाई, बेरोजगारीवरील लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी हिंदुत्वाच्या नावाने विषय उकरुन काढले जात आहेत, असे चव्हाण यांनी सांगितले.

हेही वाचा- ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायतसमिती सभापती पदांचे आरक्षण जाहीर

भगवा रंग त्यागाचे प्रतिक आहे. भाजपने परिधान केलेला भगवा रंग हा भोगाचे प्रतिक असल्याची टीका चव्हाण यांनी केली. नवनवीन बुवा महिलांवर अत्याचार करत आहेत. संत तुकाराम महाराजांचा वेश परिधान करुन मोदी साहेबांनी नागरिकांना फसविणे बंद केले पाहिजे. चित्रपट, गाण्यांमधून अश्लिलता दाखवली जात आहे. या विषयावर केंद्र सरकार मुग गिळून गप्प आहे. मग त्यांना हे पसंत आहे का. सेंसाॅर बोर्ड त्यांच्या हातात आहे. ते काय करते. या बोर्डाचा वापर करुन निर्मात्यांना अश्लिल चित्रपटांची निर्मिती करू नका सांगणे हे कोणाचे काम आहे, असा प्रश्न विद्या चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका करताना उपस्थित केला. भाजपच्या चित्रा वाघ यांनी हे विषय मोदी सरकारच्या कानावर घालावेत, असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा- ठाणे : पंजाबमधील सोनू खत्री टोळीचे गुन्हेगारांना आंबिवलीतून अटक

राज्यातील सरकार असंविधानिक आहे. केंद्रात भाजप सरकार असल्यामुळे या सरकारला बळ मिळत आहे. चौथ्या स्तंभासह प्रत्येक गोष्ट आता दबावाखाली ठेवली जात आहे. याचमुळे राज्यातील अनधिकृत सरकार टिकून आहे, अशी खोचक टीका चव्हाण यांनी केली. यावेळी कल्याण महिला आघाडीच्या पदाधिकारी, पदाधिकारी रमेश हनुमंते उपस्थित होते.