ठाण्यातील विवीयाना मॉलमधील सिनेमागृहात सोमवारी रात्री १० वाजता सुरू झालेल्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पडल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड यांनीच ‘एबीपी माझा’शी बोलताना ही माहिती दिली आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने प्रेक्षकांना सिनेमागृहात बाहेर जाण्याचे आवाहन केले. त्यानंतरही सिनेमागृहात बसून असलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावल्याने किरकोळ वादाचे प्रसंगही घडले. त्यात एका प्रेक्षकाला मारहाणही झाली. याच प्रकरणामध्ये आव्हाड यांच्यासहीत राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांना पोलीस स्थानकामध्ये बोलवून घेण्यात आलं आणि नंतर अटक करण्यात आली.

नक्की वाचा: ‘हर हर महादेव’बद्दल नेमका आक्षेप काय? आव्हाड म्हणाले, “बाजीप्रभू छत्रपती शिवाजीमहाराजांशी लढायला गेले हे कुठे…”

Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Cash theft of four lakhs by breaking the door of the clothing store pune news
वस्त्रदालानाचा दरवाजा उचकटून पावणेचार लाखांची रोकड चोरी
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Marathi Actors Akshay Kelkar First Reaction after announced abeer gulal serial will off air
‘अबीर गुलाल’ मालिका बंद होणार असल्याचं कळताच अक्षय केळकरला बसला धक्का, म्हणाला, “मला पुन्हा स्ट्रगल…”
Viral VIDEO: Drunk Constable Unzips And Urinates In Middle Of Road Outside Police Station In Agra
दारूच्या नशेत पोलिसांचे लज्जास्पद कृत्य, रस्त्याच्या मधोमध पँटची चेन उघडली अन्…; घटनेचा VIDEO व्हायरल
boney kapoor financial crisis roop ki raani movie
दिग्दर्शकाने अर्ध्यावर सोडली साथ; फ्लॉप झाला बिग बजेट सिनेमा, बोनी कपूर यांना कर्ज फेडायला लागली होती ‘इतकी’ वर्षे

जितेंद्र आव्हाड यांनीच यासंदर्भात ‘एबीपी माझा’ला माहिती दिली. दुपारच्या सुमारास विवीयाना मॉल ज्या वर्तकनगर पोलीस स्थानकाअंतर्गत येतो त्या पोलीस स्थानकामध्ये आव्हाड यांना बोलवण्यात आलं. त्यानंतर त्या ठिकाणी ठाण्याचे डीसीपी पोहोचले आणि त्यांनी आव्हाड यांना अटक करण्यात येत असल्याची माहिती दिली. कार्यकर्त्यांची मोठी गर्दी सध्या वर्तकनगर पोलीस स्थानकाबाहेर आहे. आव्हाड बाहेर येईपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली असून परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

आव्हाड यांनी यासंदर्भात, “मला पोलीस स्थानकात बोलवलं. नोटीस घ्यायला बोलवलं. त्यावेळेस मला मुंबईला जायचं असल्याने मीच येतो पोलीस स्थानकात नोटीस घ्यायला असं सांगितलं आणि इथं आलो. त्यानंतर मी इथं चहा पीत असतानाच डीसीपी राठोड आले. त्यांची हतबलता चेहऱ्यावर दिसत होती. त्यांनी मला तुम्हाला अटक करावी लागेल असं म्हणाले,” अशी माहिती दिली.

नक्की वाचा >> सुप्रिया सुळे शिवीगाळ प्रकरण: “तो नेमका कोणत्या धर्माचं…”; इस्लामचा उल्लेख करत आव्हाड अब्दुल सत्तारांवर संतापले

“हे पोलिसी कायदे आहेत. चित्रपटाचं विकृतीकरण झालेलं हे प्रकरण. या चित्रपटामधून छत्रपती शिवाजी माहाराजांबरोबरच मराठा समाजाची बदनामी झाली. त्यावर आक्षेप घेतल्याने कारवाई होत असेल तर मी महाराजांचा मोठा रक्षक, अभ्यासक आहे. हे सरकार मला रोखू शकत नाही. हे सरकार महाराजांना बदनाम करणाऱ्यांचं आहे की रोखणाऱ्यांचं? अनैतिहासिक इतिहास दाखव्यासाठी अटक होणार असेल तर मी जेलमध्ये जाईल. जामीन पण करणार नाही,” असंही आव्हाड म्हणाले. “थोडी धक्काबुक्की झाली ती कार्यकर्त्यांमध्ये झाली. पण मी या अटकेचं स्वागत करतो. महाराष्ट्राला पोलीस राजची ओळख माझ्या अटकेमुळे होईल. आणि यात कसला जामीन. घरी जेवायचं तर जेलमध्ये जेऊ,” असं म्हणत आव्हाड यांनी जामीन मागणार नाही, असं स्पष्ट केलं.

नक्की वाचा >> ‘हर हर महादेव’ वादावर गृहमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मल्टीप्लेक्समध्ये शिरुन तिथल्या लोकांना…”

“पोव्हिजनल एफआयआरमधील कलमं बेलेबल आहेत. अडकवण्यासाठी स्पेशल कलम शोधून आणलं आहे. कट केला आहे. सरकार कट करत आहे. पोलीस हतबल आहेत. पोलीस हे पोलीस राहिलेच नाहीत ठाण्यात. प्रत्येक पोलीस स्थानकाबाहेर बाळासाहेबांची शिवसेना अशा पाट्या लावणार आहेत. मला कोणी आदेश दिलेत माहिती नाही. पण जनतेला कळालं आहे मी कोणाबद्दल बोलतोय,” असं आव्हाड मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा थेट उल्लख न करता म्हणाले.