ठाणे : राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अनंत करमुसे यांना मारहाण केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी सुमारे ५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहेत. एप्रिल २०२०  मध्ये आव्हाड यांच्या ठाणे येथील निवासस्थानी अनंत करमुसे यांना मारहाण झाली होती. या मारहाणीप्रकरणी वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अटकही केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 आव्हाड हे मंत्री असताना ५ एप्रिल २०२० मध्ये अनंत करमुसे यांना मारहाण झाली होती. ही मारहाण आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप करमुसे यांनी केला होता. त्यानंतर याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता. दरम्यान, पोलिसांच्या तपासात त्रुटी असल्याचे आरोप करत करमुसे हे सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात यापूर्वी तीन आरोपपत्र दाखल आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mla jitendra awad in the case of beating anant karamuse charge sheet ysh