राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार व प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी आज विधानसभेत पुन्हा एकदा ठाणे महानगर पालिकेतील ‘सुमित बाबा’नामक व्यक्तीचा उल्लेख केला. गेल्या अधिवेशनातही जितेंद्र आव्हाडांनी या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख केला होता. त्यामुळे नेमकी ही व्यक्ती आहे तरी कोण? याची उत्सुकता निर्माण झाली आहे. यासंदर्भात ठाण्याच्या राजकीय वर्तुळातून वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. आज जितेंद्र आव्हाडांनी विधानसभेत बोलताना “हा सुमित बाबा आयुक्तांच्या खांद्याला खांदा लावून फिरत असतो”, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी टीका केली.

ठाण्यातील समस्यांचा आव्हाडांनी वाचला पाढा!

“ठाणे स्मार्ट सिटी हे स्वप्नं पाहून आता ठाणेकर कंटाळले आहेत. हे शहर स्मार्ट होणार कधी? हा प्रश्न प्रत्येक ठाणेकराला पडला आहे. काँक्रिटीकरणात मधलाच पट्टा उखडला जातोय. काही ठिकाणी काँक्रिटीकरण करताना फक्त पंजे मारून त्यावर रोलिंग केलं जातं. साडेतीन किलोमीटरच्या रस्त्याला कोणत्याही वळणाचा भाग न देता डिव्हायडर टाकले जातात. म्हणजे यू टर्न मारायचा असेल, तर पाच किलोमीटर पुढे जाऊन यायचं. त्यामुळे ट्रॅफिक जाम होतोय. कुणाचंही काहीच लक्ष नाही. लक्ष फक्त एकाच माणसाचं आहे. त्याचं नाव आहे सुमित बाबा. हा सुमित बाबा पालिका आयुक्तांच्या खांद्याला खांदा लावून फिरत असतो. हा सुमित बाबा कोण आहे? त्याची आरती कोण करतं?” असा सवाल आव्हाडांनी विधानसभेत केला.

heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
young girl fight with ola auto viral video
“ये आदमी पागल है”, तरुणीने रिक्षाचालकाला केली शिवीगाळ अन्…, पुढे जे घडलं ते खतरनाक, पाहा VIDEO
Who will understand the pain of parents
“आई वडिलांचे दु:ख कोण समजून घेणार” चिमुकल्याने सांगितले आई बाबांना वेळ देण्याचे दोन फायदे, VIDEO होतोय व्हायरल
Congress, votes, Nayab Singh Saini, Nayab Singh Saini pune,
खोटी आश्वासने देऊन मतविभागणीचा काँग्रेसचा उद्योग, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचा आरोप
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
Hritik Roshan And Rajnikant
“मला जे वाटेल, ते मी…”, जेव्हा हृतिक रोशनच्या चुकीची रजनीकांत यांनी घेतलेली जबाबदारी; अभिनेत्याने आठवण सांगत म्हटलेले, “त्यांनी माफ…”

“हा सुमित बाबा सांगतो की तुमच्या भाग्यात हा टर्न धोक्याचा आहे, की तो टर्न बंद केला जातो. सुमित बाबा सांगतो हा टर्न मारा, मग आपले आयुक्त साहेब टर्न मारतात. हा सुमित बाबा कोण आहे? हे शोधूनकाढण्याचे आदेश सरकारला देण्यात यावेत”, अशी मागणी आव्हाडांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली.

“मलाही सुमीत बाबाचा भक्त व्हायचंय”, जितेंद्र आव्हाडांचा खोचक टोला; म्हणाले, “बाबानी फोन केला की लगेच…!”

“ठाण्याच्या उड्डाणपुलांवर किंवा गल्ल्यांमधल्या लाईट्सच्या पोलवर स्पायरल लाईट लावलेत. पण त्यातले ९० टक्के बंद आहेत. त्याची बिलं देऊन झालेली आहेत. ठाण्यातल्या विविध रस्त्यांवर पेंटिंग करण्यात आलं आहे. स्वच्छतागृहांमध्ये भांडी नाहीत, दारं नाहीत, गरीब माणूस शौचासाठी डोंगरावर जातो. याची जबाबदारी कुणाची? यासाठी दिलेल्या पैशांचं वाटोळं झालं. स्पायरल लाईटवर चौकशी लावा”, अशीही मागणी जितेंद्र आव्हाडांनी केली.