राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ आज(सोमवार) सकाळी ठाण्यातील तीन हात नाक्याजवळ मुख्य महामार्गावर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन सुरू झालं.
राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राजभवनावर धडकणार होते. २० बसखाड्यांसह खासगी गाड्या मुंबईच्या दिशेने जात असताना सुरक्षेच्या दृष्टेकोनातून ठाणे पोलिसांनी या सर्व गाड्या आनंदनगर टोलनाका येथे अडविल्या. पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. आमदार जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवकही ताब्यात.
जितेंद्र आव्हाड यांना धक्काबुक्की –
दरम्यान जितेंद्र आव्हाड यांना धक्काबुक्की झाल्याचे देखील समोर आले आहे, याशिवाय आंदोलक कार्यकर्त्यांकडून महामार्ग रोखण्याचा देखील प्रयत्न झाला असून, मोठ्याप्रमाणात पोलीस फौजफाटा दाखल झालेला आहे. आंदोलकांना पोलीस ताब्यात घेत आहेत.