ठाणे : अजित पवार यांना कोण ओळखत, त्यांची ओळख काकांमुळेच आहे, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले होते. या विधानाचा समाचार घेत राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. अजित पवार जेव्हा पहिल्यांदा निवडून आले, तेव्हा श्रीकांत शिंदे डायपरमध्ये होते, अशी टीका परांजपे यांनी केली आहे. अजित पवार हे आपल्या कर्तृत्वावर प्रसिद्ध झाले आहेत, बाप, पक्ष चोरून नाही. उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसून नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.

हेही वाचा >>> ठाण्यात जलमापके बसविण्याचे काम होणार सहा महिन्यांत पूर्ण; जलमापके बसविण्याचे काम २० टक्के शिल्लक

cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Raju Patil Sandeep Mali
राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
maharashtra assembly election 2024 ncp participation in power was certain with shinde rebellion ajit pawar
शिंदे यांच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीचाही सत्तेत सहभाग निश्चित; अजित पवार यांचा गौप्यस्फोट
airoli vidhan sabha marathi news
ऐरोलीतील बंडोबांना शिंदे सेनेचे अभय ?
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
Eknath Shinde, Eknath Shinde comment on Mahavikas Aghadi, Mehkar,
मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, “धनुष्य चोरायला ते काही खेळणं आहे का? लाडक्या बहिणींना एकविसशे रुपये…”

खासदार श्रीकांत शिंदे यांचा जन्म १९८७ साली झाला.  त्यांच्या जन्माच्या आधीपासून अजित पवार हे सार्वजनिक जीवनात सक्रीय आहेत. श्रीकांत शिंदे ज्यावेळेस डायपरमध्ये रांगत असतील, तेव्हा म्हणजे १९९१ साली अजित पवार हे खासदार झाले होते.  तेव्हापासून त्यांनी आपली स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केलेली आहे. पण, ज्यांची स्वतःची ओळख ही खोक्यांपासून सुरू होऊन वडील, पक्षचिन्ह आणि पक्षच चोरण्याचे झाली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसणारी ओळख ज्यांची आहे, त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका करू नये, असे प्रत्युत्तर परांजपे यांनी दिले. राजकीय क्षेत्रातील वरिष्ठ व्यक्तींबाबत श्रीकांत शिंदे नेहमी एकेरीच उल्लेख करत असतात. त्यावरून त्यांचे  संस्कार आणि संस्कृती नेहमीच दिसून येत असते. त्यामुळे त्यांच्याकडून काही अपेक्षाच नाही. परंतु, अजित पवारांवर टीका करताना त्यांनी तारतम्य पाळावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांना ३३ देशात ओळखतात पण, ती ओळख काय आहे, याचा श्रीकांत शिंदे यांनी विचार करावा, असा टोलाही त्यांनी लगावला. कर्नाटकात मुख्यमंत्री शिंदे यांना पहायला गर्दी होते, असेही श्रीकांत शिंदे म्हणाले. तेही बरोबरच आहे. कारण, तेथील लोक बघायला येतात की महाराष्ट्रातील असा कोणता “हुशार मुख्यमंत्री”  आहे की जो महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा पंतप्रधान असा उल्लेख करतो आणि एमपीएससीचा प्रश्न निवडणूक आयोगात नेतो, असा टोलाही त्यांनी लगावला.  मुंबई आणि खेडच्या सभेत आणलेली माणसे भाषणे ऐकायला का थांबली नाहीत, हे तथाकथित लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या मुलाने सांगावे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा >>> डोंबिवलीत आयरे गावात पालिकेच्या आरक्षित भूखंडावर मोबाईल मनोरा

शेतकऱ्यांचा मुलगा मुख्यमंत्री झालेला धनदांडग्यांच्या पचनी पडत नाही, असेही विधान त्यांनी केले आहे. पण,  महाराष्ट्रातील शेतकरी अवकाळीच्या संकटात आहेत. त्यांचे पंचनामे झालेले नाहीत, शासकीय मदत मिळालेली नाही, अशा स्थितीत मुख्यमंत्री शिंदे प्रचारासाठी फिरत आहेत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.  उद्या सर्वोच्च न्यायालयात निकाल लागणार आहे. त्यामुळे कर्नाटकात प्रचारासाठी फिरणाऱ्या एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांची अवस्था “अमीत शहा आम्हाला वाचवा” अशी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. आपली राजकीय, सामाजिक आणि वैचारिक उंची आधी तपासून घ्यावी आणि नंतर अजित पवारांवर टीका करावी. अजितदादांनी आपली ओळख आपल्या कामाने निर्माण केली आहे. करोना काळात अजित पवारांच्या कामाचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केले होते, हे श्रीकांत शिंदे यांनी पहावे, असेही ते म्हणाले.