ठाण्यातील विवीयाना मॉलमधील सिनेमागृहात सोमवारी रात्री १० वाजता सुरू झालेल्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पडल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापताना दिसत आहे. आव्हाडांवरील कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते जयंत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. “जितेंद्र आव्हाड यांनी नेमका कोणता गुन्हा केला आहे ? छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीच्या विरोधात लढणे, हा आजच्या महाराष्ट्रात गुन्हा झाला आहे.” असं जयंत पाटील यांनी ट्वीट केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांना अटक

जयंत पाटील म्हणाले, “जितेंद्र आव्हाड आणि काही लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर जो सिनेमा प्रदर्शित झाला हर हर महादेव यात इतिहासाची मोडतोड करून, दाखवण्याचं काम झालं त्याचा निषेध व्यक्त केला. संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही छत्रपती शिवजी महारांजावर श्रद्धा असणाऱ्या माणसाला विचारलं, तर तो हे कधीच सहन करणार नाही. त्यामुळे जितेंद्र आव्हाड आणि महाराष्ट्रातील अनेक लोक हळूहळू पुढे येत आहेत.” एबीपी माझाशी ते बोलत होते.

विश्लेषण: जितेंद्र आव्हाडांच्या अटकेपर्यंत पोहोचला ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा वाद ; नेमकं काय आहे प्रकरण?

याशिवाय “या सिनेमात इतिहासाचं जे विद्रुपीकरण आहे, काही मुलभूत बदल दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ते महाराष्ट्रात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात चालू शकत नाही, त्याला त्यांचा विरोध आहे. ते एकत्रीत येऊन त्याच्या संतापाची लाट उसळली आणि त्यातून काही घटना झाली. घटनेनंतर दोन कलम लावण्यात आली होती, आता आणखी एक नवीन कलम ओढूनताढून लावण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. सरकार खजील झालेलं आहे.

हेही वाचा – “चंद्रशेखर बावनकुळेंनी अगोदर आपला मेंदू तपासावा आणि मग…”; शरद पवारांवरील टीकेला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर

रकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूने यात दिसत नाही. उलट सरकारने सिनेमा तयार करताना यामध्ये इतिहासाचे विद्रुपीकरण करणाऱ्यांना जाब विचारण्याऐवजी याबाबत निषेध व्यक्त करणाऱ्यांनाच अटक करण्याचं काम सरकार करत आहे. महाराष्ट्रातून आता हा सिनेमा जवळपास सगळीकडून बाहेर गेलेला आहे. तो कुठे दाखवू शकतील असं मला वाटत नाही. सगळीकडे लोकांच्या मनात संताप आहे. जितेंद्र आव्हाडांनी खरंतर गुन्हा केलेलाच नाही.” असंही यावेळी जयंत पाटील यांनी सांगितलं.

हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘या’ मागणीसाठी आमदार रोहित पवारांनी पाठवलं पत्र, म्हणाले…

याचबरोबर “सरकारला हे लक्षात आलेलं आहे की महाराष्ट्रात हरहर महादेव सिनेमा चालू शकणार नाही. त्यामुळे सरकार खजील झालेलं आहे. खजील झालेल्या सरकारने चिडून आता जितेंद्र आव्हाडांवर राग काढायला सुरुवात केलेली आहे.” असा आरोपही जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncps first reaction to jitendra awhads arrest state president jayant patil said msr