देशासह जगाच्या कानाकोपऱ्यात विविध उद्योग, व्यवसायांमध्ये ब्राह्मण समाजातील तरुण, तरुणी उद्योजक म्हणून हिरीरिने काम करत आहेत. जगातील सात महत्वपूर्ण कंपन्यांमधील चार कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे ब्राह्मण समाजातील आहेत. गाव, खेडी, शहरी भागातून आर्थिक परिस्थितीवर मात करत पुढे येऊन उद्योग, व्यवसाय करत हा वर्ग पुढे जात आहे. अशा समाजातील नव उद्योगातील तरुण, तरुणींना मार्गदर्शन करण्यासाठी ‘ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल’ (बीबीएनजी) सारख्या संस्था महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. अशा संस्थांची आता खूप गरज आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केले.
हेही वाचा- डोंबिवली रेल्वे स्थानकात छतावरील पत्रे काढल्याने प्रवासी उन्हात
‘ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल’ संस्थेच्या मुंबई विभागातर्फे ब्राह्मण उद्योजकांची दोन दिवसांची परिषद डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले रंगमंदिरात आयोजित केली आहे. या परिषदेत उद्यम, जीवनगौरव पुरस्कार देऊन गुणवंत उद्योजकांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात करण्यात आले. यावेळी संस्था अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, मुकुंद कुलकर्णी, अरविंद कोऱ्हाळकर, अरविंद नांदापूरकर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, अभिनेते प्रशांत दामले उपस्थित होते.
मागील काही काळात नोकरी हाच ब्राह्मण समाजाचा पेशा होता. आता त्या पलीकडे जाऊन ब्राह्मण समाजातील मुले, मुली देशासह जगाच्या विविध भागात उद्योग, व्यवसाय करताना दिसतात. अनेकांनी आपल्या क्षेत्रात प्राविण्य मिळवले आहे. विदेशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ब्राह्मण वर्गाची आघाडी आहे. भाकरवडी पासून ते मद्य निर्मिती क्षेत्रातील या वर्गाचा आवाका पाहिला तर मोठी क्षेत्रे ब्राह्मण उद्योजकांनी पादाक्रांत केली आहेत. देशाच्या उद्योग, अर्थव्यवस्था वाढीस हा वर्ग मोठा हातभार लावत आहे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.
हेही वाचा- डोंबिवली : शिळफाटा रस्ते बाधित शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात
ज्या काळात लढाईची गरज होती त्यावेळी ब्राह्मण वर्ग तलवार घेऊन रणांगणावर उतरला. समाज सुधारणा करायची होती तेव्हा सुधारकाची भूमिका बजावली. अशा विविध सेवा क्षेत्रात ब्राह्मण वर्गाने मोठी कामगिरी केली आहे. या वर्गातील ज्येष्ठ ब्राह्मण उद्योजकांनी नव्याने उद्योगात पुढे येणाऱ्या ब्राह्मण समाजातील तरुणींना मार्गदर्शन, पाठिंबा देण्यासाठी बीबीएनजी सारख्या संस्था स्थापन करुन मोठे काम केले आहे. अशाप्रकारे अनेक समाज संस्था विविध भागात निस्वार्थीपणे कार्यरत आहेत, ही कौतुकास्पद गोष्ट आहे, असे फडणवीस म्हणाले.
हेही वाचा- राष्ट्रीय लोक अदालतमध्ये १२८ कोटींची ४९ हजार प्रकरणे निकाली
प्रत्येक उद्योजक कष्ट, मेहनत करत मोठा झालेला असतो. अशा उद्योजकांचे नव उद्योजकांना मार्गदर्शन प्रेरणादायी असते. अनेकांना व्यवसाय करण्याची इच्छा असते पण शिक्षण, पैसा, मार्गदर्शन यांची त्यांना उणीव असते. ही उणीव बीबीएनजी सारख्या भरुन काढण्याचे काम करतात. या संस्था कधी काही शासनाकडे मागत नाहीत. त्या स्वयंभू आहेत. याचे कौतुक आहेत. पण सरकार म्हणून अशा संस्थांना गरजू व्यावसायिक, मार्गदर्शन, शिक्षण, रोजगार संधी याविषयी काही साहाय्य हवे असेल तर ते नक्कीच आपण व्यक्तिश आणि सरकार म्हणून मदत करण्यास तयार आहोत, असे आश्वासन उपस्थित उद्योजकांना फडणवीस यांनी दिले.
आपण अलीकडच्या काळात बाहेरच्या वातावरणात ठोशाला ठोसा देण्याचे जे उत्तम काम करता. त्याबद्दल समाधान व्यक्त अध्यक्ष कुलकर्णी यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले.
उद्यम पुरस्कार
श्रीपाद खेर, संदीप झा, अमित महाजन, अरविंद कोऱ्हाळकर, हेमंद वैद्य, जितेंद्र जोशी, रवींद्र प्रभुदेसाई,
जीवन गौरव पुरस्कार
विलास जोशी, शरयू देशमुख, गिरिश चितळे, आचला जोशी.