वेदिका कंटे

ठाणे – सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे स्थानकातील पादचारी पुल प्रवाशी संख्येच्या तुलनेत अपुरे पडू लागल्याने याठिकाणी नवीन दोन पादचारी पुलाच्या कामांची उभारणी सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांमुळे संथगतीने सुरू असलेल्या पुलाच्या कामांना गेल्या काही दिवसांपासून वेग आला असून येत्या डिसेंबर महिनाअखेरपर्यंत पुलाचे काम उरकून ते प्रवासी सुविधेसाठी खुले करण्याची तयारी रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे, अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली.

speeding bike hit police, pune, bike hit police,
पुणे : नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना भरधाव दुचाकीची धडक, दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीसह चौघे जखमी
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
cash seized south mumbai ahead of assembly elections in maharashtra
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कारवाई ; सव्वा दोन कोटींची रोख जप्त
Unauthorized parking lots, dhabas, Dronagiri,
उरण : द्रोणागिरी, पुष्पकनगरमध्ये अनधिकृत वाहनतळ, ढाबे
Dombivli railway station work
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट एक-ए वरील सरकता जिना, उतार वाट रेल्वे पुलाच्या कामासाठी बंद
challenges in infrastructure development in india
महाशक्तीचं स्वप्न पाहणाऱ्या देशात एवढी ‘पडझड’ का होतेय?
Widening of Uran-Panvel road to be fourteen meters soon
उरण-पनवेल मार्ग लवकरच चौदा मीटर, सात कोटींच्या कामाची निविदा आचारसंहितेत अडकली

हेही वाचा >>> सात प्रकल्पांचा खर्च फुगण्याची शक्यता; १४ हजार कोटींच्या कंत्राटांच्या वाटपानंतर ‘पुनर्विलोकन’चा घाट

मध्य रेल्वेच्या स्थानकातील ठाणे स्थानक हे सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हणून ओळखले जाते. या स्थानकातून दररोज पाच ते सहा लाख प्रवासी प्रवास करतात. त्यात नोकरदार वर्गाची संख्या मोठी आहे. ठाण्याहून लाखो नोकरदार मुंबई तसेच ट्रान्स हार्बर मार्गे प्रवास करतात. त्यामुळे ठाणे स्थानकात नेहमीच गर्दीचे दृश्य असते. ठाणे स्थानकात प्रवासी सेवेसाठी एकूण पाच पादचारी पुल आहेत. त्यातील स्थानकाच्या मधोमध असलेला पुल रुंद आहे तर, उर्वरित चार पुल अरुंद आहेत. त्यातील मुंबई आणि कल्याण दिशेकडील पुल ६० वर्षांपूर्वीचे जुने होते. हे पुल धोकादायक झाल्याने ते पाडून त्या जागी नवीन पादचारी पुलांची उभारणी करण्यात येत आहे. यामुळे सद्यस्थितीत तीन पुल अस्तित्वात असून त्यावर प्रवाशांचा भार वाढला आहे. करोना काळ आणि त्यानंतर निधी उपलब्ध होत नसल्याने या पुलांची कामे संथगतीने सुरू होती. यामुळे प्रवाशांमधून रेल्वेच्या कारभारावर टिका होऊ लागताच रेल्वे प्रशासनाने पुलांच्या कामाचा वेग वाढविला. या पूल बांधणीसाठी ठाणे महानगरपालिकेकडून १२ कोटींचा निधी प्राप्त झाला असून यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पुलांची कामे वेगाने सुरू आहेत. येत्या डिसेंबर महिनाअखेरपर्यंत पुलाचे काम उरकून ते प्रवासी सुविधेसाठी खुले करण्याची तयारी रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे, अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली.

निधी अभावी काम दोन वर्षे रखडले

ठाणे महानगरपालिकेकडून ठाणे स्थानकात मुंबई दिशेकडे. कल्याण दिशेकडे तसेच मुंब्रा येथे एक पादचारी पूल उभारण्यात येणार होते. त्यासाठी महापालिकेकडून २७ कोटींच्या निधी देण्याची तरतूद आहे. या निधीतील बारा कोटी निधी महापालिकेकडून प्राप्त झाला आहे. त्यामुळे या नव्या पादचारी पूलांच्या बांधकामास वेग आला आहे. त्यापैकी ८ कोटी रुपये रेल्वेला देण्यात आले होते. या निधीतून पुलाच्या खांबांची उभारणी करण्यात आली. त्यानंतर निधी अभावी हे काम दोन वर्षे रखडले. यानंतर ठाणे महापालिकेने चार कोटीचा निधी दिला. त्यातून पुलावर तुळई बसविण्यात आली. उर्वरित १५ कोटी ६२ लाख ५१ हजार ७१८ रूपयांचा निधी लवकर देण्याची मागणी रेल्वे प्रशासनाने पालिकेकडे काही महिन्यांपुर्वी केली होती. पालिकेनेही तात्काळ निधी देण्याची तयारी दाखविली होती. यामुळे पुलाच्या कामांना गेल्या काही दिवसांपासून वेग आला आहे.

ठाणे स्थानकातील मुंबई आणि कल्याण दिशेकडील पादचारी पुलाच्या उभारणीची कामे वेगाने सुरू असून ही कामे लवकरात लवकर पुर्ण करण्याचा रेल्वेचा मानस आहे.

पी.डी. पाटील- जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे