ठाणे : पालघरमध्ये रस्त्याअभावी डोलीतून नेण्यात आलेल्या गर्भवतीस आरोग्य सेवा उपलब्ध न झाल्याने जुळय़ा बालकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच ठाणे जिल्ह्यातही दोन दिवसांपूर्वी अशीच घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. भिवंडी तालुक्यातील धरणीचा पाडा येथील एका गर्भवतीला प्रसूती वेदना सुरू झाल्याने गावकऱ्यांनी तिला रस्ता खराब असल्याने झोळीतून आरोग्य केंद्रापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र रस्त्यातच तिची प्रसूती झाली. तर वेळीच उपचार न  मिळाल्याने नवजात अर्भकाचा मृत्यू झाला आहे. दर्शना परले (३५) असे या महिलेचे नाव असून तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भिवंडी येथे दिघाशी ग्रामपंचायतीच्या हद्दीत धरणीचा पाडा असे गाव आहे. गावापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या आरोग्य केंद्रावर दर्शना यांना गावकऱ्यांनी उपचाराकरिता नेण्याचे ठरविले. मात्र गाव ते आरोग्य केंद्र दरम्यान पक्का रस्ता नसल्याने कोणतेही मोठे वाहन गावात येऊ शकत नव्हते. यामुळे गावकरी दर्शना यांना झोळीत टाकून आरोग्य केंद्रात जाण्यासाठी निघाले. मात्र वाटेतच प्रसूती झाली. या वेळी नवजात बाळाला लागलीच उपचार न मिळाल्याने त्याचा झोळीतच मृत्यू झाला. यानंतर  गावकऱ्यांनी आरोग्य केंद्राशी संपर्क साधत दर्शना यांना वज्रेश्वरी येथील आरोग्य केंद्रात  दाखल केले. जिल्हा आरोग्य विभागाला या बाबतची माहिती मिळताच संबंधित महिलेला उपचारासाठी वज्रेश्वरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली आहे.