ठाणे : महापालिका क्षेत्राचे वाढते नागरिककरण लक्षात घेऊन पुढील ३० वर्षांत शहराला प्रतिदिन १ हजार ११६ दशलक्षलीटर इतका पाणीपुरवठा होणे अपेक्षित असून त्याआधारे ठाणे महापालिकेने शहराचा पाणी नियोजन आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार विविध धरणांतून वाढीव पाणी घेण्याचे नियोजन असून या पाणी आरक्षणासाठी ठाणे महापालिकेने शासनस्तरावर प्रयत्न सुरू केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ठाणे शहराची लोकसंख्या २७ लाखांच्या आसपास आहे. शहरात चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्ष लीटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. ठाणे महापालिकेस सद्यस्थितीमध्ये ६१६ दशलक्षलीटर इतका प्रतीदिन एवढा कोटा मंजूर आहे. प्रत्यक्षात मात्र तितका पाणीपुरवठा होत नाही. तसेच जुन्या वाहिन्या आणि गळतीमुळे काही ठिकाणी टंचाईची समस्या निर्माण होते. त्यावर मात करण्याचे काम पालिकेमार्फत सुरू असतानाच, पालिका प्रशासनाने आता पुढील ३० वर्षांमध्ये शहराची वाढणारी लोकसंख्या विचारात घेऊन मुबलक व योग्य प्रमाणात पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, या दृष्टीकोनातून नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. यानियोजनानुसार पुढील ३० वर्षांत शहराला प्रतिदिन १ हजार ११६ दशलक्षलीटर इतका पाणीपुरवठा होणे अपेक्षित असून त्यासाठी विविध धरणांतून पाणी आरक्षण ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा सुरू करण्यात आल्याचे ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

हेही वाचा – ठाण्यात जलमापके चोरीचे प्रकार सुरूच, गेल्या पाच वर्षांत १५४१ जलमापकांची चोरी

ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करण्यासाठी पुर्ननियोजनाचे काम करण्यात येत आहे. तसेच केंद्रशासनाच्या अमृत २.० अंतर्गत पाणी वहन, वितरण करण्यासाठी जलवाहिन्या टाकणे, जलकुंभ, संप पंप हाऊस बांधणे, विद्युत पंप बसविणे अशा कामांना मंजुरी मिळाली असून ही कामे सुरू करण्यात आली आहेत. विविध संस्थांकडून पाणी उपलब्ध करुन घेत असताना नियमित देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवावा लागतो. या बंदमुळे पुढील दोन ते तीन दिवस शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर अल्पकालीन आणि दीर्घकालीन म्हणजेच पुढील ३० वर्षांचा विचार करुन वाढीव पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी महापालिकेने पाणी आरक्षण ठेवण्याबाबत नियोजन केले असल्याचेही आयुक्त बांगर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे शहरातील पाणी समस्यांबाबत बैठक झाली होती, त्यामध्ये बारवी धरणातून १०० दशलक्षलीटर इतका पाण्याचा वाढीव कोटा महापालिकेस देण्याचे निर्देश दिले होते. तसेच भातसा धरणातून ठाणे महापालिकेच्या योजनेद्वारे सध्या २५० दशलक्ष लीटर पाणी उचलले जाते. त्यामध्ये ५० दशलक्षलीटरची वाढ करुन अतिरिक्त कोटा मंजूर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या होत्या. हा वाढीव कोटा मिळावा अशी मागणी पालिकेने जलसंपदा विभागाकडे केली आहे. मिराभाईंदर महापालिकेस सूर्या धरणातून येत्या काळात २१८ दशलक्षलीटर पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सद्यस्थितीत एम.आय.डी.सी आणि स्टेममार्फत त्यांना दिला जाणारा पाण्याचा कोटा हा अतिरिक्त होणार आहे. हा अतिरिक्त उपलब्ध होणाऱ्या कोट्यामधून एमआयडीसीमार्फत ५० दशलक्षलीटर आणि आणि स्टेमकडून ५० दशलक्षलीटर पाणी ठाणे महापालिकेस उपलब्ध व्हावे तसेच पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुका येथे होत असलेल्या देहरजी धरणामधून २०० दशलक्षलीटर प्रती दिन पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणीही पालिकेने जलसंपदा विभागाकडे केली आहे.

हेही वाचा – ठाणे पोलीस दलात मोठे फेरबदल; सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

ठाणे महापालिका क्षेत्रातील २०५५ पर्यंतच्या भविष्यातील लोकसंख्येचा विचार करता साधारणत: प्रतिदिन १ हजार ११६ दशलक्षलीटर इतका पाणीपुरवठा होणे अपेक्षित आहे. त्यासाठी भविष्यात होऊ घातलेल्या काळू धरणातून ४०० दशलक्ष लीटर प्रतीदिन एवढा पाणीसाठा महापालिकेस उपलब्ध व्हावा, अशी मागणीचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने मुंबई महानगर आयुक्त आणि प्रधानसचिव, जलसंपदा विभाग यांना पाठविला आहे. जलसंपदा विभागामार्फत बांधण्यात येणाऱ्या शहापूर येथील मुमरी धरणाचे काम येत्या काळात पूर्ण होणार असून त्यामधून १०० दशलक्षलीटर पाणी आरक्षित ठेवण्याची मागणी जलसंपदा विभागास करण्यात आली आहे, असे आयुक्त बांगर यांनी सांगितले.