डोंबिवली- डोंबिवली एमआयडीसीतील आईस फॅक्टरी रस्त्याच्या २०० मीटरच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर बांधकाम विभागाने या रस्त्याच्या साईबाबा मंदिरापर्यंतच्या दुसऱ्या १०० मीटरच्या टप्प्याचे हाती घेण्याचे नियोजन केले आहे.

एमआयडीसीतील आईस फॅक्टरी रस्त्याची खड्ड्यांनी चाळण झाली आहे. या रस्त्यावर खड्डे बुजविण्याची कामे करण्यापेक्षा या रस्त्याचे पुनर्पृष्ठीकरण आणि काँक्रीटीकरणाची कामे करणे आवश्यक असल्याने डोंबिवली बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी या रस्त्याच्या पुनर्पृष्ठीकरणाचा प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर या रस्त्याच्या पहिल्या २०० मीटरच्या टप्प्याचे काम गणेशोत्सव झाल्यानंतर सुरू करण्यात आले होते. हे काम गेल्या १५ दिवसापूर्वी पूर्ण करण्यात आले. या रस्ते कामामुळे मानपाडा, आईस फॅक्टरी रस्ता भागात वाहतूक कोंडी होत असल्याने वाहूतक विभागाने ही कामे घाईने करण्यासाठी तगादा लावला होता. विहित वेळेत कामे पूर्ण करुन रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला, असे कार्यकारी अभियंता लोकरे यांनी सांगितले.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
Pimpri, Female computer operator bribe, computer operator bribe Female, bribe,
पिंपरी : सहाशे रुपयांची लाच घेताना संगणक चालक महिला अटकेत
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड

हेही वाचा >>> मनसेचा सायंकाळी हर हर महादेव चित्रपटाचा मोफत शो; राष्ट्रवादी-मनसे समोरासमोर येण्याची शक्यता

दुसरा साईबाबा मंदिर पर्यंतचा १०० मीटरचा टप्पा रस्त्याचे काम तातडीने करणे आवश्यक आहे. या रस्त्याच्या पुढील भागाची चाळण झाली आहे. हा रस्ता वेळेत पूर्ण केला नाहीतर प्रवाशांचा रोष कायम राहिल. हा विचार करुन कार्यकारी अभियंता लोकरे यांनी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, शहर अभियंता अर्जुन अहिरे यांना या रस्ते कामाचे महत्व पटवून सांगितले. आयुक्त डॉ. दांगडे यांनी तातडीने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

आईस फॅक्टरी रस्त्यावरुन मानपाडा रस्ता, गांधीनगर, स्टार कॉलनी भागातील वाहने एमआयडीसी, सोनारपाडा भागातील महाविद्यालयांमध्ये जातात. त्यांना हे रस्ते काम सुरू केल्यानंतर काही दिवस वळसा घेऊन जावे लागणार आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी २० ते २५ दिवस लागणार आहेत. या कामाचे काही दिवस वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक विभागाशी चर्चा करुन हे रस्ते काम लवकरच सुरू केले जाणार आहे, असे लोकरे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> हत्या करून गुप्तांग कापून तोंडात कोंबले…भिवंडीतील धक्कादायक प्रकार

संथगती रस्ते

‘एमएमआरडीए’च्या निधीतून एमआयडीसी आणि ‘एमएमआरडीए’ तर्फे ११० कोटीच्या एमआयडीसी रस्ते कामातील एक महत्वाचा टप्पा मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर करण्याऐवजी गेल्या आठ महिन्यापूर्वी एका ठेकेदाराने आतल्या गल्लीतील रस्त्यावर काम केले. हा रस्ता आता अडगळीत पडला आहे. अंबरनाथच्या ठेकेदाराने हे काम केले आहे. एमआयडीसी निवासी, औद्योगिक क्षेत्रात गेल्या वर्षी ११० कोटीचे रस्ते मंजूर झाले आहेत. ही कामे गतीने होतील असे आश्वासन माजी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या रस्त्यांच्या भूमिपूजन कार्यक्रम दिले होते. परंतु, ही कामे अतिशय संथगतीने सुरू असल्याने निवासी भागातील रहिवासी, उद्योजक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. या रस्त्यांवरुन काही महिन्यांपासून स्थानिक आ. प्रमोद पाटील, खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यात कलगीतुरा रंगला होता.