लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : राज्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेने शनिवारी (एनआयए) ठाणे जिल्ह्यात केलेल्या कारवाईमुळे भिवंडी तालुक्यातील अतिसंवेदशील असलेला पडघा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पडघा तसेच भिवंडी शहरातील तीन बत्ती, इस्लामपुरा आणि शांती नगर भागात कारवाई करण्यात आली आहे.

sachin pilot
धार्मिक मुद्द्यावर बोलणाऱ्या भाजपला ‘पढोगे तो बढोगे’ हे सांगण्याची वेळ; सचिन पायलट यांची टीका
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Prahlad Joshi statement that the plan of Congress in Karnataka is on the verge of closure Kolhapur news
काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर; प्रल्हाद जोशी
During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Shivajinagar Constituency BJP Vs Congress Rebellion in Congress Congress nominated Dutta Bahirat against BJP MLA Siddharth Shirole Pune
शिवाजीनगरमध्ये ‘सांगली पॅटर्न?’
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त

यापूर्वी पडघा भागातून मुंबई साखळी बाँबस्फोट प्रकरणात साकीब नाचण याला अटक झाली होती. त्यानंतर पडघा गाव तपास यंत्रणांच्या नोंदीवर आला होता. एनआयए, दहशतवादी विरोधी पथके यासह विविध तपास यंत्रणांचे पडघ्यावर लक्ष आहे. पोलिसही या भागात डोळ्यात तेल घालून असतात. शनिवारी अचानकपणे एनआयएची पथक पडघा भागात दाखल झाली आणि त्यांनी कारवाई सुरू केली. या कारवाई वेळी स्थानिक पोलिसांना मोठा बंदोबस्त तैनात ठेवला होता. गावात केंद्रीय तपास पथकांचे दाखल होणे येथील नागरिकांना नवे नाही. परंतु अचानक कारवाई झाल्याने गावात खळबळ उडाली. सकाळपासून पोलिसांची वाहने मोठ्या संख्येने रस्त्याकडेला उभी असल्याने नागरिकांमध्ये याविषयीच्या चर्चा रंगल्या होत्या. भिवंडी शहरातील तीन बत्ती, शांतीनगर आणि निजामपुरा जवळील इस्लामपुरा येथे देखील कारवाई करण्यात आली आहे. एनआयएच्या पथकाने येथील काही संशयितांच्या घरांची झडती घेतली आहे.

आणखी वाचा-ठाणे : ‘घोडबंदर’वरील घाटरस्ता मंजुरीच्या प्रतीक्षेत

पडघा नेहमी चर्चेत का ?

पडघा सर्वाधिक चर्चेत आला तो म्हणजे, साकीब नाचण याच्या अटकेतनंतर. ‘सिमी’ या संघटनेची संबंधित तसेच मुंबईत २००२ आणि २००३मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात सामील असलेला साकीब नाचण याला पडघ्यातील त्याच्या बोरीवली गावातून अटक झाली होती. त्याच्या अटकेदरम्यान, काही ग्रामस्थांनी पोलिसांना अडविण्याचा आणि हल्ल्याचा प्रकार झाला होता. साकीब याची २०१७ मध्ये त्याची सुटका झाली. सुटकेनंतरही साकीबचे गावात जंगी स्वागत झाले होते. काही महिन्यांपूर्वीच एनआयएने अकिब नाचण याला ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा एकदा पडघा चर्चेत आला आहे. त्यानंतर एनआयएने पडघा येथे पुन्हा कारवाई करण्यास सुरूवात केली होती. काही महिन्यांपूर्वीच पडघा भागातून एनआयएने शरजील शेख आणि झुल्फिकार बडोदावाला या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना मदत करणाऱ्या आकिबला देखील याच भागातून ताब्यात घेतले होते. आकिबचा बोरीवली गावात मोठा बंगला आहे. आता पुन्हा मोठी छापेमारी पडघ्यात झाल्याने पडघा चर्चेत आला आहे.

आणखी वाचा-बदलापूर, उल्हासनगरची हवा अतिप्रदूषित स्तरावर

पडघा येथील बोरीवली गाव हे सुमारे सात ते आठ हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावात कोकणी मुस्लिम आणि आदिवासी सर्वाधिक राहतात. अनेकजण या गावात व्यवसायिक आहेत. लाकडांच्या विक्रीतून गावातील अनेकांची आर्थिक समृद्धी झाली. त्यामुळे बहुतांश ग्रामस्थांचे कोट्यवधीचे बंगले पाहायला मिळतात. तसेच अनेकांच्या जमीनीही अधिक आहेत. तर भिवंडी शहरातील शांतीनगर, इस्लामपुरा आणि तीन बत्ती भागात संमिश्र वस्ती आहे.