डोंबिवली: डोंबिवली एमआयडीसी परिसरात पावसाचे प्रमाण कमी होताच रात्रीच्या वेळेत रासायनिक दुर्गंधी येऊ लागली आहे. मंगळवारी रात्री दुर्गंधीचे प्रमाण वाढल्याने या भागातील जागरुक नागरिक, ‘कामा’ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एमआयडीसीतील नाला परिसरात फिरून नाल्यात रसायन ओतलेले रिकामे पिंप हस्तगत केले. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार करुन अज्ञाता विरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> कल्याण: ‘फेरीवाला मुक्त रस्ते आणि खड्डे मुक्त शहर’ उपक्रम यशस्वी करण्यासाठी आयुक्तांची रात्रभर भ्रमंती

हेही वाचा >>> बनावट शेतकरी दाखला प्रकरणाच्या तपासासाठी तक्रारदाराची वरिष्ठांकडे तक्रार; ठाणेनगर पोलिस अडचणीत येण्याची चिन्हे

गेल्या दोन दिवसांपासून एमआयडीसी निवासी, खंबाळपाडा भागात रात्रीच्या वेळेत रासायनिक दुर्गंधी येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. मंगळवारी रात्री दुर्गंधीचे प्रमाण वाढल्याने खंबाळपाड्याचे रहिवासी काळू कोमास्कर, ‘कामा’ संघटनेचे अध्यक्ष देवेने सोनी, राजू बेल्लूर यांनी दुर्गंधी कोणत्या भागातून येते याचा तपास सुरू केला. नाल्यातील पाण्याचा रंग त्यांनी तपासला. त्यावेळी त्यांना पाण्यात रसायन ओतले असल्याचे आढळले. त्यांनी खंबाळपाडा येथून नाल्यातील पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे चालत रसायन ज्या भागातून वाहत येते त्या भागापर्यंत रात्री पदभ्रमण केले. मिलापनगर मधील बस थांब्या मागील नाल्या जवळ रात्रीच्या वेळेत अज्ञात इसमाने तीन ते चार पिंप भरुन रसायन आणून ते नाल्यात ओतून तो पळून गेला असल्याचे दिसून आले.

हेही वाचा >>> समस्यांच्या विळख्यातील डोंबिवली गावाला दत्तक घ्या ; जागरुक नागरिकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आर्जव

अध्यक्ष सोनी यांनी तातडीने ही माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिली. अधिकारी घटनास्थळी आले. त्यांनी पाण्याचे नमुने घेतले. कामाचे देवेने सोनी, राजू बेल्लूर यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन रात्री तीन वाजता जाऊन नाल्यात रासायनिक मिश्रण ओतून जलप्रदूषण आणि परिसरात दुर्गंधी पसरविल्याबद्दल तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. नाला भागातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पोलीस पिंप घेऊन येणाऱ्या टेम्पो चालकाचा शोध घेत आहेत.

एका अज्ञात टेम्पो चालकाने नाल्यात दुर्गंधीयुक्त रसायन ओतून पळून गेला होता. त्याच्यामुळे या भागात दुर्गंधी पसरली होती. अन्य कोणतेही कारण दुर्गंधीचे नाही.

– देवेन सोनी, अध्यक्ष कामा संघटना