ठाणे : मेट्रोच्या कामासाठी घोडबंदर मार्गावरील मानपाडा आणि कासारवडवली भागात तुळई बसविण्याचे काम केले जाणार आहे. या कामासाठी ठाणे पोलिसांनी वाहतूक बदल लागू केले आहेत. हे वाहतूक बदल १८ ऑगस्टपर्यंत दररोज रात्री ११ ते पहाटे ५ यावेळेत हे बदल लागू असणार आहेत. घोडबंदर भागात मेट्रो चार मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. काही भागात मेट्रोचे खांब उभारणीचे काम पूर्ण झाले असून त्या खांबांवर तुळई उभारण्याचे काम केले जाते. त्यानुसार मानपाडा आणि कासारवडवली भागात तुळई उभारणी केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या कामादरम्यान वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी मानपाडा आणि कासारवडवली भागातील रस्ता बंद केला जात असून वाहतूक पोलिसांनी १८ ऑगस्ट पर्यंत येथे वाहतूक बदल लागू केले आहेत. मुंबई आणि ठाणे येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या सर्व अवजड वाहनांना कापूरबावडी येथे प्रवेशबंदी करण्यात आली आहे. येथील वाहने खारेगाव, मानकोली, अंजूरफाटा मार्गे किंवा बाळकूम, कशेळी, अंजूरफाटा मार्गे वाहतूक करतील.

हेही वाचा >>> डोंबिवलीत रामनगरमधील बालभवनला फेरीवाले, टपऱ्यांचा विळखा

मुंब्रा, कळवा येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ही वाहने खारेगाव टोलनाका येथून मानकोली, अंजूरफाटा मार्गे वाहतूक करतील. नाशिक येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ही वाहने अंजूरफाटा मार्गे वाहतूक करतील. तसेच हलकी वाहने मानपाडा येथे रस्ता बंद असल्याने मानपाडा येथून टिकूजीनी वाडी, मुल्ला बाग येथून पुन्हा मुख्य मार्गाच्या दिशेने वाहतूक करतील. तर कासारवडवली येथे आनंद नगर सिग्नल येथील सेवा रस्त्याने वाहन चालक वाहतूक करतील, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.