ठाणे जिल्हय़ाच्या ग्रामीण भागात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. मात्र प्रसिद्धीअभावी त्यांची माहिती कमी जणांनाच असते. नुकताच कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट झालेल्या निळजे गावातील निसर्गरम्य तलाव हा त्यापैकीच एक. कल्याण ग्रामीण भागातील मुख्य जलस्रोत असलेला हा तलाव म्हणजे या गावाचे वैभवच!
गेल्या वर्षी स्थानिक प्रशासनाने या तलावाला नवसंजीवनी दिल्याने तलावाच्या निसर्गरम्यतेआणखी भर पडली आहे. चहुबाजूने नटलेली हिरवाई, आकर्षक पदपथ, रमणीय उद्यान आणि रात्रीची रोषणाई यांमुळे तलावाचे सौंदर्य आणखीनच वाढलेले आहे.
कल्याण-शिळ रोडवर बदलापूर बायपासच्या पुढे निळजे गाव लागते. गावाच्या वेशीवरील कमानच या गावाचा मार्ग दाखवते. या कमानीपासून पाच मिनिटे अंतरावर हा आकर्षक तलाव आहे. या तलावाचे पूर्वीचे नाव होते बोराला तलाव. पण आता त्याचे नामकरण करून संत ज्ञानेश्वर माऊली तलाव असे करण्यात आले आहे. तलावाचा आकार प्रचंड मोठा आहे. तलावाच्या चहुबाजूने विविध प्रकारची फुलझाडे व फळझाडे लावण्यात आली आहेत. त्यामुळे तलावाचे सौंदर्य आणखीनच खुलून येते.
दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद प्रशासनाने या तलावाचे सुशोभीकरण केले. हा तलाव प्रेक्षणीय स्थळ व्हावे आणि फिरस्त्यांनी त्याला भेट द्यावी यासाठी तलावाच्या सौंदर्यीकरणात वाढ करण्यात आली. तलावाच्या बाजूला आकर्षक उद्यान तयार करण्यात आले. या उद्यानात विविध खेळांची साधने ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर घटकाभर विसावा घेण्यासाठी पत्र्याची शेड टाकून एक निवारा मंडप तयार करण्यात आला आहे. या निवारा शेडमध्ये बसून तलावातील पक्षी आणि आकर्षक कमळफुले न्याहाळण्यात एक वेगळाच आनंद आहे.
तलावाच्या एका बाजूला ज्येष्ठ नागरिकांसाठी एकमजली ज्येष्ठ नागरिक भवन तयार करण्यात आले आहे. त्यात ग्रंथालय, मनोरंजन केंद्र व ध्यानकेंद्राचा समावेश आहे. तलावाच्या बाजूलाच वेताळेश्वर मंदिर असून तलावाकाठील या मंदिरामुळे तलावाचे सौंदर्य आणखी वाढविते.
सहज सफर : निसर्गरम्य निळजे तलाव!
गेल्या वर्षी स्थानिक प्रशासनाने या तलावाला नवसंजीवनी दिल्याने तलावाच्या निसर्गरम्यतेआणखी भर पडली आहे.
Written by संदीप नलावडे
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-02-2016 at 07:39 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nilje lake main water resources for rural areas of kalyan