ऑनलाईन गेमच्या माध्यमातून कथित धर्मांतर प्रकरणी रविवारी ठाणे पोलिसांनी एकाला अलिबाग येथून ताब्यात घेतले. शाहनवाज खान असे त्याचे नाव असून मागील काही दिवसांपासून गाजियाबाद पोलीस त्याचा शोध घेत होते. शाहनवाज हा मुंब्रा येथे वास्तव्यास होता. त्याने अनेकांचे धर्मांतर घडविल्याचा दावा गाजियाबाद पोलिसांनी केला होता. परंतु, त्याची अधिक चौकशी केली असता पोलिसांनी महत्त्वाची माहिती मिळाली आहे.

मुंब्रा परिसरात एकही धर्मांतराचे प्रकरण आढळले नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. अटक केलेल्या आरोपीची चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीत धर्मांतराचे एकही प्रकरण पोलिसांनी सापडले नाही.

Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Pansare murder case, ATS claim, high court,
पानसरे हत्या प्रकरणाचा सर्व पैलूंनी तपास, एटीएसचा उच्च न्यायालयात दावा
History Of Tipu Sultan
एका रात्रीत ८०० मंड्यम अय्यंगारांची हत्या; ‘नरक चतुर्दशी’ हा दिवस शोकदिवस का ठरला?
Paaru
अहिल्यादेवीचा जीव धोक्यात? बंदूक घेऊन किर्लोस्करांच्या घरात एका व्यक्तीने केला प्रवेश, ‘पारू’ मालिकेत मोठा ट्विस्ट
Shah Rukh Khan News
शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला छत्तीसगडमधून अटक; ५० लाखांची मागितली होती खंडणी

नेमकं प्रकरण काय?

गाझियाबाद पोलीस उपायुक्त निपुण अग्रवाल यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, “मुंब्रा येथे सुमारे ४०० लोकांचे सामूहिक धर्मांतर केल्याची माहिती मिळाली आहे, ज्याची अद्याप पडताळणी करणे बाकी आहे. या निवेदनाच्या आधारे मुंब्रा ज्यांच्या अखत्यारीत येतो, त्या ठाणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.”

ऑनलाईन गेमच्या माध्यमातून मुंब्रा येथे राहणाऱ्या शाहनवाज हा मुलांशी संपर्क साधून झाकीर नाईक याच्या भाषणाविषयी चर्चा करत होता. त्यानंतर तो मुलांचे धर्मांतर करत असे. या घटनेप्रकरणी गाजियाबाद येथील कविनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास करण्यासाठी गाजियाबाद पोलीस मुंब्रा शहरात शाहनवाजचा शोध घेत होते. शाहनवाज याने ४०० मुलांचे धर्मांतर केल्याची चर्चा समाजमाध्यमांवर प्रसारित होत होती. तर गाजियाबाद पोलिसांनीही शाहनवाजने मुंबईतील अनेकांचे धर्मांतर केल्याचा दावा केला होता.

ठाणे पोलिसांनी काय माहिती दिली?

ठाणे डीसीपी (झोन १) गणेश गावडे म्हणाले, “आम्ही आरोपी शाहनवाज खानची चौकशी केली असून मुंब्र्यामध्ये धर्मांतराची कोणतीही घटना घडली नसल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

गाझियाबाद पोलिसांनी खानला ठाणे कोर्टात हजर केले होते. ठाणे कोर्टाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. म्हणजेच, तीन दिवसांच्या आत गाझियाबाद येथील न्यायालयात त्याला हजर करणे बंधनकारक आहे. तसंच, त्याला सुरक्षितपणे घेऊन जाणे ही पोलिसांची जबाबदारी असल्याचंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

या प्रकरणातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, “गाझियाबाद पोलिसांनी यापूर्वी अटक केलेल्या मौलवी अब्दुल रहमानच्या खात्यातून २० हजार रुपये हस्तांतरित केल्याचे त्यांना आढळले आहे. एका तरुणाचे गेमिंग प्लॅटफॉर्मवर कथितरित्या धर्मांतर झाल्याच्या प्रकरणात रेहमानला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी आता पुढील तपास गाझियाबाद पोलीस करणार आहेत.”