ठाणे: स्थानक परिसरात नेहमीच नागरिकांचा गजबजात पाहायला मिळतो. अनेकदा नागरिकांना येथून मार्ग काढणे कठीण होते, इतकी रहदारी याठिकाणी असते. परंतू, मध्य रेल्वेने शुक्रवार पासून घेतलेल्या मेगाब्लाॅकमुळे स्थानक परिसराने मोकळा श्वास घेतल्याचे दिसून आले. नागरिकांची अगदी तुरळक गर्दी या ठिकाणी होती. नेहमी रिक्षाची वाट पाहत उभे असणारे प्रवासी आज हे चित्र बदललेले होते. रिक्षा चालक प्रवाशांच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे मध्यवर्ती शहर असून येथे लोकवस्ती मोठ्याप्रमाणात आहे. त्यामुळे शहराची लोकसंख्याही जास्त आहे. शहरातील वेगवेगळ्या भागातून मोठ्यासंख्येने नागरिक दररोज ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करतात. त्यामुळे स्थानक परिसर सकाळ- संध्याकाळ गजबजलेला दिसून येतो. दररोज गावदेवी मंदिरापासून ते स्थानक पर्यंत प्रवाशांची रहदाळी पाहायला मिळत असते. परंतू, शुक्रवारी मेगाब्लॅाकमुळे हे चित्र बदलेले दिसून आले. ऐन शुक्रवार म्हणजेच कामाचा दिवस असून देखील स्थानक परिसरात नागरिकांची रहदारी नव्हती. स्थानक परिसरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला होता.

हेही वाचा : डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्यांचे सर्वेक्षण तात्काळ थांबवा, उद्योजकांची एमआयडीसी अधिकऱ्यांकडे मागणी

मध्य रेल्वे महामार्गावरील काही महत्त्वाचे कामे करण्यासाठी शुक्रवार पासून मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे, अशी पूर्व सुचना मध्य रेल्वे मार्फत देण्यात आली होती. त्यानुसार, अनेक कार्यालयांनी कर्मचाऱ्यांना या मेगाब्लाॅकचा त्रास होऊ नये यासाठी घरातून काम करण्याची सुचना दिली होती. तर, काही नोकरदारांनी स्वत:च्या वाहनांनी किंवा खासगी वाहनाने कार्यालय गाठले. तसेच नोकदारवर्गा व्यतिरिक्त काही इतर नागरिक कामानिमित्त बाहेर पडत असतात. ते देखील मेगाब्लाॅकमुळे घरा बाहेर पडले नाही. त्यामुळे रस्त्यावर फार तुरळक गर्दी दिसून आली.

हेही वाचा : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील इंग्रजी माध्यमाच्या शाळा अनधिकृत

रिक्षा चालक प्रवाशांच्या प्रतिक्षेत

ठाणे स्थानक येथील गावदेवी मंदिर परिसरात शेअरिंग रिक्षाचा थांबा आहे. या थांब्यालर दररोज सकाळी ६ वाजल्यापासून रिक्षा चालक प्रवासी वाहतूक करत असतात. बदलापूर, कल्याण-डोंबिवली तसेच मुंबईतून ठाण्यात कामासाठी येणारे नोकरदार या थांब्यावरुन रिक्षा पकडतात. त्यामुळे येथे प्रवाशांची तसेच रिक्षा चालकांची मोठी गर्दी आणि गोंधळ पाहायला मिळतो. नेहमी प्रवासी रिक्षा चालकांच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून येतात. मात्र, आज चित्र उलटे होते. रिक्षा चालक हे प्रवाशांच्या प्रतिक्षेत असल्याचे पाहायला मिळाले. या मेगाब्लाॅकमुळे अनेक नोकरदारांना घरुन काम करत आहेत. त्यामुळे आज प्रवाशांची संख्या घटली असून दररोज उत्पन्नात घट झाली असल्याची प्रतिक्रिया स्थानक परिसरातील एका रिक्षा चालकाने दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No crowd outside thane railway station due to central railways mega block css