गणेशोत्सव काळात होणारी वाहतूक कोंडी काही नवीन नाही. मात्र त्याचसोबत बदलापूरकरांना पार्किंग कोंडीलाही सामोरे जावे लागते आहे. एकीकडे शहरातील पार्किंगचा प्रश्न गंभीर होत असताना पालिकेने पार्किंगची जागा जत्रेतील पाळण्यांसाठी दिल्याने वाहनचालकांची प्रचंड कोंडी होते आहे. त्यात बदलापुरातील सर्वात स्वस्त पार्किंगही बंद झाल्याने नागरिकांना आर्थिक भरुदड सोसावा लागत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
बदलापुरातील मानाचा मानला जाणारा माघी गणेशोत्सव नुकताच सुरू झाला आहे. त्यासाठी शहरात मोठय़ा प्रमाणावर पाळणे आणि विक्रेते येत असतात. यंदा त्यातील काही पाळण्यांनी रेल्वे स्थानकाजवळच असलेल्या दुकानासमोरील मोकळ्या जागेतही पाळणे टाकले आहेत. त्याचसोबत समोरच्या भागातही काही स्टॉल्स लावले गेलेले आहेत. त्या जागी पालिकेची पार्किंग व्यवस्था होती. जी गेल्या आठवडय़ाभरापासून बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे तेथे दुचाकी घेऊन येणारे प्रवासी त्रस्त झाले आहेत. पार्किंगमधून येणारे उत्पन्नही या काळात बंद झाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा