ठाणे शहरातील वृंदावन परिसरातील महावितरणच्या केंद्रामध्ये देखभाल दुरुस्ती काम हाती घेण्यात येणार असून त्यामुळे शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळात शहरातील काही भागाचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात फ्लॉवर व्हॉली, गोल्डन पार्क, चिराग नगर, हरिराम संतराम, माजिवाडा गाव, केटिको, सेट डेव्हलपर, ओसवाल पार्क, रूतू पार्क, आनंद पार्क, वर्धमान इंडस्ट्रियल इस्टेट, सद्गुरू सोसायटी, कोलबाड, वृंदावन सोसायटी,

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रीरंग सोसायटी आणि राबोडी या परिसराचा वीजपुरवठा या काळात बंद राहणार आहे, अशी माहिती महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडळाच्या वतीने देण्यात आली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No power supply in thane