लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : भिवंडी येथील शांतीनगर भागात रस्ते दुरुस्तीचे काम सुरू असून येथील जलवाहिनी इतरत्र स्थलांतरित केली जाणार आहे. या कामासाठी भिवंडीतील काही भागाचा पाणी पुरवठा उद्या, सोमवारी २४ तास बंद असणार आहे. तसेच पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती भिवंडी महापालिकेने दिली.
शांतीनगर येथील जलवाहिनीलगत असलेल्या रस्त्याचे काम केले जाणार आहे. या कामादरम्यान ५०० मीमी व्यासाची जलवाहिनी बाधित होत आहे. ही जलवाहिनी इतरत्र स्थलांतरित करण्याचे नियोजन प्रशासनाचे आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी ८ ते मंगळवारी सकाळी ८ या कालावधीत भिवंडीतील काही भागाचा पाणी पुरवठा बंद असणार आहे. तसेच पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.
आणखी वाचा-मुंबई महानगरात बनावट जिऱ्याची विक्री; भिवंडी पोलिसांच्या कारवाईत उघड
भिवंडीतील या भागात होणार परिणाम
शांतीनगर, न्यु आझादनगर, संजय नगर, गोविंदनगर, सहयोगनगर, बिलालनगर, पिराणीपाडा, गैबीनगर परीसर, गुलजारनगर, अंसारनगर, किदवाईनगर, खान कंपाऊंड, गणेश सोसायटी, जोहर रोड परीसर, नदीयापार परीसर, भाजी बाजार परिसर, जब्बार कंपाऊंड, वफा कंपाऊंड, न्हावी पाडा, मर्चट सायजिंग परीसर, सत्तार टेकडी परीसर.