उल्हासनगरमधील कॅम्प क्रमांक तीनमध्ये मंगळवारी दुपारी तीन ते पाच वर्षे वयोगटातील मुले रस्त्यावर खेळत असताना, अचानक पिसाळलेल्या एका भटक्याने कुत्र्याने या खेळकरी मुलांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. या मुलांना कुत्र्यापासून वाचविण्यासाठी काही पादचारी, स्थानिक रहिवासी पुढे सरसावले, त्यांनाही या पिसाळलेल्या कुत्र्याने लक्ष्य केले. या भटक्या कुत्र्याने २० जणांना चावा घेतला आहे. त्यामध्ये १६ लहान मुले व चार स्त्रियांचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्व जखमींवर उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. कॅम्प क्र. ३ मधील सी ब्लॉक रस्त्यावर मंगळवारी दुपारी तीन ते पाच वयोगटांतील १५ ते १६ मुले रस्त्यावर गटागटाने खेळत होती. अचानक या भागात एक पिसाळलेला भटका कुत्रा आला. त्याने खेळत असलेल्या मुलांना चावे घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे बेसावध असलेली मुले सैरावैरा पळू लागली. तरी या मुलांचा पाठलाग करून कुत्रा त्यांना चावू लागला. १६ मुलांच्या हात, पायांना या कुत्र्याने चावे घेतले. मुलांचा वाचविण्यासाठी परिसरातील चार स्त्रिया पुढे आल्या. त्यांनाही कुत्र्याने लक्ष्य केले. अठरा जणांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. एक मूल व स्त्रीला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असे रुग्णालयातील सूत्राने सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nomadic dog bit twenty student in ulhasnagar