अंबरनाथ: आपली वक्तव्ये आणि चमत्कारिक घटनांच्या दाव्यामुळे अनेकदा चर्चेत आणि वादात सापडलेल्या श्री बागेश्वर धाम येथील धिरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांचा अंबरनाथ येथे तीन दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मात्र या कार्यक्रमामुळे कोणत्याही प्रकारचा तेढ निर्माण होऊ नये याची काळजी घेण्याचे आवाहन करणारी नोटीस धिरेंद्र महाराज यांना अंबरनाथ पोलिसांनी बजावली आहे.

अंबरनाथ पूर्वेतील शिवमंदिराजवळ श्री बागेश्वर धाम सरकार उत्सव समिती अंबरनाथतर्फे धिरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांचे हनुमत कथा आणि दिव्य दर्शन सोहळयाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास सुमारे ७० हजार पेक्षा जास्त जनसमुदाय येणार असल्याचा अंदाज आहे. मात्र या धिरेंद्र महाराज यांचे यापुर्वीचे कार्यक्रमाच्या ठिकाणी अंधश्रध्दा पसरवितात, त्याआधारे समाजाचे विविध मार्गाने आर्थिक मानसिक शोषण करणे, चमत्काराचा दावा करून लोकांची दिशाभुल व फसवणुक केली जात आहे. तसेच आपलेकडून महाराष्ट्रातील संत तुकाराम महाराज, शिर्डी साईबाबा व महापुरुषाचा अवमान केल्याने अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समिती, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती, संभाजी ब्रिगेड यांनी यापुर्वी आपल्या कार्यक्रमांस विरोध दर्शविलेला आहे, असा आशय शिवाजी नगर पोलीस ठाण्याने बजावलेल्या नोटिशीत आहे.

Nana Patole
Nana Patole : “उत्तमराव जानकरांसह आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार, पण…”; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा
Ajit Pawar on Mahavikas Aghadi MLA's Oath as a Maharashtra Legislative assembly Member
“मविआ आमदारांना उद्या शपथ घ्यावीच लागेल, अन्यथा…”, अजित पवारांचा इशारा
Salman Khan
‘दबंग’ रिलोडेड लाइव्ह कॉन्सर्टसाठी सलमान खान सज्ज; म्हणाला, “स्टेजवर जाण्याआधी कपडे…”

फौजदारी दंड प्रकीया संहीता कलम १४९ अन्वये श्री धीरेंद्र कृष्णा शास्त्री महाराज (बागेश्वर धाम सरकार ) यांचेकडून महाराष्ट्रातील संत व महापुरुषांचा अवमान होणार नाही. कोणत्याही धर्माच्या भावना दुखावणार नाहीत किंवा वैयक्तीक भावना दुखावतील असे भाष्य, वक्तव्य, घोषणा, हावभाव चमत्कारांचे दावे आणि जनसमुदायामधील नागरिकांकडून होणार नाही. तसेच महाराजाच्या चिथावणीवरून हस्तकांकडून दोन धर्मात तेढ निर्माण होवून जनतेच्या जिवीतास मालमत्तेस धोका निर्माण होईल असे कोणतेही कृत्य तसेच अंधश्रध्दा प्रतिबंध कायदयाचे उल्लंघन करून भाविकांची दिशाभूल करून समाजामध्ये अंधश्रध्देचा प्रसार होईल असे कृत्य होणार नाही याची गांभिर्य पुर्वक दक्षता घ्यावी, असे आवाहन या नोटीसमध्ये करण्यात आले आहे. या कार्यक्रमामुळे कोणताही अनुचित प्रकार झाल्यास आणि त्यामुळे सार्वजनिक शांतता भंग होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपण आणि आपल्या सहकाऱ्याविरुध्द प्रचलित कायदयानुसार कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही त्या नोटीस मध्ये नमूद करण्यात आले आहे.

Story img Loader