दारूबंदी आणि किल्ला संवर्धनासाठी पुरातत्त्व विभागाचा निर्णय

वसईच्या किल्ल्यातील प्रलंबित समस्यांवर पुरातत्त्व विभागाकडून उपाययोजना करण्यात येणार आहेत. किल्ल्यावर ठिकठिकाणी सूचना व महिती फलक लावण्यात येणार आहेत. किल्ल्यावरील पर्यटनाबाबतचे नियम, इतर सूचना तसेच किल्ल्याची माहिती या फलकांमध्ये नमूद करण्यात येईल. त्यामुळे किल्ल्यातील अनधिकृत बांधकामे, मद्यपानासाठी किल्ल्यावर येणारे पर्यटक याला आळा बसेल व किल्ल्याच्या संवर्धनास हातभार लागेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Ursekarwadi, Dombivli, Skywalk staircase,
डोंबिवलीत उर्सेकरवाडीमधील स्कायवॉक जिन्याच्या पायऱ्यांवर प्रवाशांची घसरगुंडी
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Ulhasnagar Water Supply, Women Movement ,
ठाणे : “पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत मागे हटणार नाही”, संतप्त नागरिकांचा पाणीपुरवठा कार्यालयात ठिय्या
Redevelopment , Developers Committee, Old Thane ,
जुन्या ठाण्यातील पुनर्विकासासाठी विकासकांची समिती
mahajyoti obc loksatta news
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय : ‘महाज्योती’चे ५ जिल्ह्यांत ‘उत्कृष्टता केंद्रे’ स्थापन होणार…
Wildlife scientists and animal researchers claim about the golden fox thane news
मानवी वस्तीत येणारे सोनेरी कोल्हे निवासीच! वन्यजीव शास्त्रज्ञ, प्राणी अभ्यासकांचा दावा
investment opportunities in India,
साहसी भांडवलदारांसाठी संधीचा सुकाळ
experts express affordable housing solutions in indian expres thinc our event
शहरांमध्ये परवडणारी घरे उपलब्ध करून देणे शक्य!

वसईच्या किल्ल्यातील प्रेमीयुगुलांमुळे तसेच प्री वेडिंग छायाचित्रणामुळे किल्ल्याचे पावित्र्य नष्ट होत असल्याचा आरोप दुर्गमित्र करत आहेत. त्या संदर्भात पुरातत्त्व विभागाकडे अनेक तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत. यावर पुरातत्त्व विभागाने किल्ल्यावर कोणत्या गोष्टी करता येतील अथवा करता येणार नाहीत याच्या सूचना देण्याचा निर्णय घेतला आहे. लावण्यात येणाऱ्या फलकांद्वारे किल्ल्यातील प्रत्येक ठिकाणाची व वास्तूची माहितीही दिली जाणार आहे. तसेच किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकही नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुरातत्त्व विभागाच्या या निर्णयामुळे किल्लाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

याबाबत लवकरच निर्णय होणार असून डिसेंबरच्या सुरवातीला हे फलक लावण्यात येणार आहेत. किल्ल्यात व्यावसायिक फोटोग्राफी करत अश्लील चाळे करणाऱ्यांविरोधात तात्काळ कारवाई करण्यात येते. प्री वेडिंग शूटसाठी शुल्क आकारण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे, याबाबतचा निर्णय दुर्गप्रेमींच्या बाजूने घेण्याचा आमचा प्रयत्न असेल.

– कैलास शिंदे, उपविभाग अधिकारी, पुरातत्त्व विभाग, वसई

‘प्री वेडिंग’साठी शुल्क व नियमावली?

वसई किल्ल्यात गेल्या काही वर्षांपासून ‘प्री वेडिंग शूट’चे फॅड वाढत चालले आहे. यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना या व्यावसायिक छायाचित्रणाचा मोठय़ा प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो. पुरातत्त्व विभाग सध्या व्हिडीओ शूटिंग तसेच ट्रायपॉडसह चित्रीकरण करावयाचे असल्यास त्यासाठी ५० हजार रुपये शुल्क तर १० हजार रुपये ठेव म्हणून आकारते. परंतु ट्रायपॉडशिवाय फोटोग्राफी केल्यास त्यास कोणतेही शुल्क आकारण्याची तरतूद नाही. त्यामुळे प्री वेडिंग शूटबाबत योग्य निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी किल्लप्रेमींनी केली आहे.

Story img Loader