कल्याण – टिटवाळा अ प्रभाग क्षेत्रातील नऊ प्रभाग हद्दीतील २२ हजार १९३ मालमत्ता कर थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीच्या अखेरच्या पूर्व सूचना नोटिसा प्रशासनाने दिल्या आहेत. या सूचना नोटिशीनंतर थकबाकीदारांनी मालमत्ता कर भरणा केला नाहीतर त्यांची मालमत्ता जप्त करण्याची कार्यवाही प्रशासनाकडून केली जाणार आहे.

मालमत्ता विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अ प्रभागाच्या साहाय्य्क आयुक्त प्रीती गाडे, अधीक्षक वसंत बाविस्कर आणि सहकारी ही कार्यवाही करत आहेत.

Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Supreme Court orders MHADA to submit details of flats grabbed by developers Mumbai print news
विकासकांनी हडपलेल्या सदनिकांची माहिती असमाधानकारक ! पुन्हा माहिती सादर करण्याचे ‘म्हाडा’ला आदेश
Congress leader rahul Gandhi rally in nanded
आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा तोडू! नांदेडमधील सभेत राहुल गांधींकडून मोदी लक्ष्य
Municipal corporation Thane, illegal hoarding holders Thane, illegal hoarding Thane,
ठाण्यात ५२ बेकायदा होर्डिंगधारकांना पालिकेच्या नोटीसा, १० कोटी ९६ लाखांचा दंड पालिका करणार वसूल
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
80 lakh cash worth rs 17 lakh mephedrone seized in pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये ८० लाखांची रोकड, १७ लाखांचे मेफेड्रोन जप्त

हेही वाचा – कल्याण ग्रामीणमध्ये प्रकाश म्हात्रे यांचे उपजिल्हाप्रमुख पद काढले, ग्रामीण शिवसेनेत नाराजी

टिटवाळा परिसरातील मोठे गृहप्रकल्प आणि काही कंपन्यांचा या कर थकबाकीदारांमध्ये समावेश आहे. येत्या मार्च अखेरपर्यंत पालिकेला सुमारे ४२५ कोटींचे मालमत्ता कराचे लक्ष्य पूर्ण करायचे आहे. हा लक्ष्यांक पूर्ण करण्यासाठी प्रभागातील थकबाकीदारांना सूचना नोटिसा काढण्यास प्रशासनाने सुरूवात केली आहे. टिटवाळ्यातील थकबाकीदारांकडून सुमारे २५० ते ३०० कोटींहून अधिकचे येणे असल्याचे मालमत्ता विभागाकडून सांगण्यात आले.

टिटवाळा प्रभागात शहरी आणि ग्रामीण असे दोन भाग आहेत. मोकळा, निसर्गरम्य भूभाग म्हणून या भागात अनेक गृहप्रकल्प उभे राहत आहेत. काही प्रकल्पांमध्ये जमीन मालक, रहिवासी आणि विकासक यांच्यात वाद झाल्याने ही प्रकरणे न्यायालयात गेली आहेत. अशा ठिकाणी कर वसुली करताना पालिकेला शक्य होत नाही. काही गृहप्रकल्पांची स्थानिक कार्यालये कायमस्वरुपी बंद आहेत. त्यामुळे नोटिसा देताना अडथळे येत आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.

अ प्रभागातील शहाड भागात ८८९, मोहने २२६२, गाळेगाव ८३४, अटाळी १५०३, मांडा ७१९०, टिटवाळा २९९२, आंबिवली ७९४, वडवली ५५०, बल्याणी ५१७९ अशा नोटिसा प्रभागप्रमाणे देण्यात आल्या आहेत. नोटीस मिळाल्यानंतर थकबाकीदारांनी ७२ तासांच्या आत थकित रक्कम पालिकेत भरणा करायची आहे. मुदत संपल्यानंतर मालमत्ताधारकांच्या मालमत्ता जप्त करण्याची कार्यवाही प्रभागाकडून सुरू केली जाणार आहे, असे कर विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

याशिवाय मांडा भागातील ७१९०, बल्याणी येथील पाच हजार १७९ स्थावर व जंंगम मालमत्तांना नोटिसा देण्याची कार्यवाही सुरू केली जाणार आहे. यामध्ये बनीबाई चाळ, एकविरानगर, बाबा धाम, तिरुपती बालाजी निवास, सृष्टी संकुल, तिवारी चाळ, पाटील चाळ, समर्थ कृपा चाळ, संतोषी माता चाळ, नामदेव मोरे चाळ, पिंंपळेश्वर काॅलनी, लक्की होम्स, ग्लोबल चाळ, हनमान संकुल चाळ, सी. जी. चाळ, जय मल्हार चाळ, होम स्वीट होम, पंडित पाटील चाळ, सिद्दीकी होम्स, वरसिद्दी, आरती गणराज चाळ यांचा समावेश आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या नावे डोंबिवलीत फिरते पोळी भाजी केंद्र, टेम्पोतील पोळी भाजी केंद्राचा वाहतुकीला अडथळा

थकबाकीदार

बंद एनआरसी कंपनीकडे मुक्त जमीन करासह सात मिळकतींची एकूण २३९ कोटी ४७ लाख रुपये येणे बाकी आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. निर्मल लाईफ स्टाईल ४७ कोटी ६७ लाख, नेपच्यून १२ कोटी ८२ लाख, फोल्को गृहप्रकल्पाकडून १४ कोटी.

टिटवाळा परिसरातील कर थकबाकीदारांना २२ हजारांहून अधिक जप्तीपूर्वीच्या अखेरच्या पूर्वसूचना देणाऱ्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. विहित वेळेत थकबाकीदारांनी भरणा केला नाही तर त्यांच्या मालमत्ता जप्तीची कार्यवाही सुरू केली जाणार आहे. – वसंत बाविस्कर, अधीक्षक, अ प्रभाग.