डोंबिवली– डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ परिसरात रिक्षा चोरुन त्यांची विक्री करणाऱ्या एका सराईत चोरट्याला येथील टिळकनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेच्या पथकाने अंबरनाथ मधून अटक केली आहे. या चोरट्याने एकूण चार रिक्षा चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. डोंबिवली, कल्याण परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सार्वजनिक ठिकाणच्या रस्त्यावर उभ्या करुन ठेवण्यात आलेल्या रिक्षा चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. रिक्षा चोरीला गेल्याने काही रिक्षा चालकांच्या उदरनिर्वाहाचे साधन बंद झाले होते. ठराविक गुन्हेगार या रिक्षा चोरत असावा, असा पोलिसांचा अंदाज होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील सरकता जिना प्रवाशांसाठी खुला

टिळकनगर पोलीस ठाणे हद्दीत एका रिक्षा चालकाची रिक्षा चोरीला गेली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांनी तातडीने विशेष तपास पथक स्थापन केले. चोरीला गेलेल्या रिक्षा भागातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्यात एक जण रिक्षा चोरुन नेत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्यांची ओळख पटवली. तो अंबरनाथ मधील रहिवासी असल्याचे पोलिसांना समजले.पोलिसांनी अंबरनाथ भागात शोध घेऊन तांत्रिक माहितीच्या आधारे देवल उर्फ गणेश महादु गायकवाड (३०) याला शंकर मंदिराच्या बाजुला भेंडीपाडा चाळ भागातून अटक केली. देवलने टिळकनगर, कोळसेवाडी, शिवाजीनगर अंबरनाथ मानपाडा पोलीस ठाणे हद्दीतून रिक्षांची चोरी केल्याची कबुली दिली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक जगन्नाथ शिंदे, साहाय्यक उपनिरीक्षक शाम सोनवणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.