ठाणे शहरातून श्रीगणेशा; कार्यक्रमांच्या जाहिरातीचा नवा ट्रेंड
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ट्रेलर ही दोन-अडीच तासांच्या चित्रपटाची दोन ते तीन मिनिटांमध्ये करून दिलेली ओळख असते. दृक्-श्राव्य माध्यमाचा अधिक प्रभाव असणाऱ्या आताच्या काळात ठिकठिकाणी सादर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या जाहिरातीसाठीही आता अशा प्रकारच्या ट्रेलरचा वापर होऊ लागला आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या ठाण्यात त्याची सुरुवात झाली आहे. येथील कबुतर डायलॉग प्रा. लि. या कंपनीने त्यांच्या सांस्कृतिक उपक्रमांसाठी दृक्-श्राव्य ट्रेलर बनवून ते सोशल मीडियाद्वारे प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे.
सध्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी बॅनर, पोस्टर, फलक, माध्यमांमधील जाहिराती आदी पारंपरिक पद्धतीचा वापर केला जातो. त्यात आता ट्रेलरची भर पडली आहे. ठाण्यातील वरुण जैन, रोहित प्रधान आणि स्नेहा जैन या युवकांनी ही पद्धत शोधून काढली आहे. सध्या त्यांच्या ‘कबुतर डायलॉग’ या कंपनीमध्ये प्रज्वीत शेट्टी, नील साळेकर, वैशाली गद्रे, अनिकेत जाधव ही तरुण मंडळी त्यांच्या सोबत आहेत. टुमॉरो इव्हेन्ट्स अॅण्ड मीडिया हे या कंपनीच्या प्रॉडक्शन विभागाचे नाव आहे. याच नावाने सध्या यू-टय़ूबवर चॅनल सुरू आहे. या चॅनलच्या माध्यमातून कार्यक्रमांचे ट्रेलर प्रसिद्ध केल्याचे कंपनीचे संचालक वरुण जैन आणि रोहित प्रधान यांनी सांगितले.
- आतापर्यंत ‘टेक्निकलर चाय’ हा कवितेचा कार्यक्रम, पद्मश्री प्रल्हाद सिंग यांचा ‘कबीर’ हा कार्यक्रम, ‘दी होपलेस शो-पहला खेल’, ‘दी होपलेस शो-सुलभ शौचालय’, ‘स्टॅण्ड अप कॉमेडी शो’ यांसारख्या कार्यक्रमांचे ट्रेलर तयार करून यूटय़ूबवर प्रसिद्ध केले आहेत.
- त्यामधील बहुतेक कार्यक्रम हे ठाण्यातील टाऊन हॉल, काशिनाथ घाणेकर येथे झाले आहेत.
- सुप्रसिद्ध सिनेकलाकार विजू माने यांच्या ‘‘त्या’च्या आणि ‘ती’च्या मनातलं, काही. काहीही’ या कार्यक्रमाचा ट्रेलर नुकताच यूटय़ूबच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आला आहे.
- सध्या हा ट्रेलर नेटिझन्समध्ये खूप गाजत आहे. व्हॉटस्अॅप या समाजमाध्यमाचाही त्यासाठी उपयोग करता येतो. येत्या शनिवारी हा कार्यक्रम आहे.
केवळ ट्रेलरपुरती ही नवी संकल्पना मर्यादित न ठेवता, कार्यक्रमांचे चित्रण करून ते सर्वासाठी उलपब्ध करून दिले जाते. त्यात आणखी काय नवे देता येईल, याचा आम्ही विचार करत आहोत.
– वरुण जैन