ठाणे : इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर, छायाचित्र प्रसारित होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवसेनेच्या नंदूरबार जिल्हा संपर्क संघटक पर्णिता पोंक्षे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – शेतकरी मोर्चेकरांची दोन मंत्र्यांनी घेतली भेट, शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा

हेही वाचा – डोंबिवली : वर्षभरात अयोध्येत राम लल्लांची मूळ जागी प्रतिष्ठापना; स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांची माहिती

इन्स्टाग्राम या ॲपवर तैमूर अकबर औरंगजेब या नावाने एक खाते आहे. या खात्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र प्रसारित केले जात आहेत. तसेच औरंगजेबाचे उदात्तीकरण केले जात आहे. शिवसेनेच्या नंदूरबार जिल्हा संपर्क संघटक पर्णिता पोंक्षे यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कळवा पोलीस ठाण्यात याप्रकरणाची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader