ठाणे : कळवा येथील विटावा भागातील शिंदे गटाचे विभाग प्रमुख अविनाश पाटील यांचे कार्यालय बुधवारी रात्री एकाने फोडले. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. विटावा भागात अविनाश पाटील राहात आहेत. त्यांची मुलगी प्रियंका पाटील या भागातील माजी नगरसेविका आहेत. अविनाश यांचे कार्यालय विटावा परिसरात आहे. बुधवारी सायंकाळी एका व्यक्तीने त्यांच्या कार्यालयाबाहेर येऊन कार्यालयाच्या काचा फोडल्या. या घटनेप्रकरणी कळवा पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. पूर्ववैमन्यस्यातून हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा