ठाणे : शिवसेना आणि राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेस पक्षातील आमदारांचा एक गट फुटणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू असतानाच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या ठाणे शहरातील कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्यासह प्रमुख पदाधिकारी अनुपस्थित राहिल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. पदाधिकाऱ्यांना डावलून प्रदेश पातळीवरील नेत्यांनी ठाण्यातील माजी पदाधिकाऱ्यांच्या मदतीने कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळेच हा नाराजीचा सुरू उमटत असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरु असून यानिमित्ताने ठाणे काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा उघड झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे येथील डाॅ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत असलेल्या विभाग आणि सेलची एक दिवसीय कार्यशाळा शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत हि कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेआधी पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेस नेते राहुल दाखल केलेली याचिका गुजरात उच्च न्यायालय फेटाळली. न्याय व्यवस्थेवर मोदी सरकारचा दबाव आहे हे याच्यातून सिद्ध झाल्याचा आरोप करत त्यांनी आंदोलनही केले. यानंतर त्यांनी कार्यशाळेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या सर्वच ठिकाणी ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्यासह प्रमुख पदाधिकारी अनुपस्थित असल्याचे चित्र दिसून आले. शिवसेना आणि राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेस पक्षातील आमदारांचा एक गट फुटणार असल्याची चर्चा सुरू असतानाच, पटोलेंच्या कार्यक्रमाला जिल्हाध्यांसह पदाधिकारी अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा >>>डोंबिवलीतील खड्ड्यांमुळे शासनाने ‘खड्डे आपल्या दारी’ उपक्रम सुरू करावा, मनसे शहराध्यक्ष मनोज घरत यांची मागणी

एकीकडे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्यासह प्रमुख पदाधिकारी अनुपस्थित राहिले असतानाच, दुसरीकडे प्रदेश पातळीवरील पदाधिकारी माजी नगरसेवक प्रदिप राव, राजेश जाधव यांच्यासह माजी नगरसेवक शैलेश शिंदे हे कार्यक्रमाला उपस्थित होते. शैलेश शिंदे हे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेशचे पदाधिकारी मनोज शिंदे यांचे बंधू आहेत. मनोज शिंदे यांच्या मदतीनेच प्रदेशच्या नेत्यांनी हा कार्यक्रम आयोजित केल्याचे बोलले जात आहे. यातूनच स्थानिक पदाधिकाऱ्यांना डावलून प्रदेश पातळीवरील नेत्यांनी ठाण्यातील माजी पदाधिकाऱ्यांच्या मदतीने कार्यक्रमाचे आयोजन केल्याची चर्चा असून यामुळेच स्थानिक पदाधिकारी नाराज असल्याने ते कार्यक्रमाला गैरहजर राहिल्याचे बोलले जात आहे. यातूनच ठाणे काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा उघड झाल्याचे चित्र आहे.

पुर्वनिजोजित कार्यक्रमामुळे मी कार्यक्रमाला उपस्थित नव्हतो. राज्यभरातून विभाग आणि सेलचे पदाधिकारी येणार होते. आमचे पदाधिकारी उपस्थित राहिले असते तर, राज्यभरातून आलेल्या विभाग आणि सेलच्या पदाधिकाऱ्यांना बसायला जागा मिळाली नसती आणि त्यांची गैरसोय झाली असती. त्यामुळे आमचे पदाधिकारी उपस्थित नव्हते. परंतु कार्यक्रमाच्या नियोजनात आम्ही संपुर्ण सहकार्य केले होते. ठाण्यात कोणत्याही प्रकारची गटबाजी नाही. – विक्रांत चव्हाण, ठाणे जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Officials along with the district collector were absent from the program of nana patole in thane amy
Show comments