ठाणे : ठाणे येथील नौपाडा भागात बी केबिन परिसरात सोमवारी पहाटे रस्त्यावर तेल सांडले होते. रस्त्यावर सर्वत्र पसरलेल्या या तेलावरून पाच दुचाकी घसरल्या आणि तोल जाऊन दुचाकीस्वारखाली पडले. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही.
ठाणे येथील नौपाडा भागात बी केबिन परिसर येतो. या भागातून ठाणे स्थानक परिसराकडे रस्ता जातो. यामुळे या रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ असते. सोमवारी पहाटे ६.४० वाजता या रस्त्यावर तेल सांडले होते. हे तेल रस्त्यावर सर्वत्र पसरले होते.
हेही वाचा…बाळकूम भागात एका इमारतीत आग, ४० रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश
स
स
सकाळच्या वेळेत येथून जात असलेल्या दुचाकी घसरल्या आणि दुचाकीस्वार खाली पडले. पाच दुचाकी घसरून अपघात झाला. यात कुणालाही दुखापत झाली नाही. याबाबत नागरिकांनी माहिती देताच नौपाडा पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रस्त्यावर सांडलेल्या तेलावर माती टाकली आणि त्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. त्यामुळे पुढील अपघात टळले. रस्त्यावर तेल कसे सांडले, हे समजू शकलेले नाही.