अंबरनाथ शहरात लवकरच ऑलिम्पिक दर्जाच्या तरण तलावाची उभारणी केली जाणार आहे. अंबरनाथ नगरपालिकेने यासाठी नुकतीच ११ कोटी रुपयांच्या कामाची निविदा जाहीर केली आहे. यात आंतरराष्ट्रीय जलतरण महासंघाच्या नियमाप्रमाणे तरण तलाव बांधण्याचे काम केले जाणार आहे. या तरण तलावामुळे अंबरनाथ शहरात आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक सरावाची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच मुंबई आणि नवी मुंबई नंतर अंबरनाथ शहरात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धा भरवणे शक्य होणार आहे.

हेही वाचा >>>डोंबिवली: सामान्य शाळांमधील मूलभुत सुविधांसाठी लोकसहभाग महत्वाचा; सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन

In Khambhadi Koturli village Bhandara district sighting of tiger in broad daylight has created excitement among the villagers
भंडारा : वाघाला चक्क गावकऱ्यांनीच घेरले अन…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Citizens of Gondia and state experienced thrill of tigers in Navegaon Nagjira forest
नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघिणीच्या छाव्यांचा खेळ
Illegal building on road in Nandivali Samarth Chowk demolished
मानपाडा-बाह्यवळण रस्ता ते कोपर रस्त्यामधील अडथळा दूर
Annual flower exhibition detail update
निसर्गलिपी : फुलांच्या वार्षिक प्रदर्शनांना जाच!
Satavahana settlement remains were found at Tekabhatti four kilometers from Chivandagaon Gondpipari taluka
चंद्रपूर जिल्ह्यात सातवाहनकालीन वस्तीचे अवशेष; कधी होते मोठे शहर, आज आहे गर्द वनराई…
building unauthorized Check Dombivli, Kalyan Dombivli Municipal corporation,
पालिकेच्या संकेतस्थळावर इमारत अधिकृत की अनधिकृत याची खात्री करा, कल्याण डोंबिवली पालिकेचे आवाहन
pune water planning delayed due to absence of Guardian Minister
Pune Water planning : पालकमंत्री नसल्याने पाणी नियोजन लांबणीवर

अंबरनाथ शहराला क्रीडा नगरी म्हणून नावलौकिक मिळवून देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीने अंबरनाथ नगरपालिकेने तयारी सुरू केली आहे. काही वर्षांपूर्वी स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून अंबरनाथ शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शूटिंग रेंज सुरू करण्यात आले होते. या शूटिंग रेंजमुळे मुंबई, पुण्यानंतर थेट अंबरनाथमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांची तयारी करणे सोपे झाले होते. आज येथे प्रशिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर अनेक स्पर्धा जिंकत आहेत. याच धर्तीवर अंबरनाथ शहरात भव्य असे क्रीडा संकुल उभारले जाते आहे. त्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे निकष पाळत खेळांची मैदानी तयार केली जात आहे. अंबरनाथ शहराला क्रीडा नगरी म्हणून नावलौकिक मिळवून देण्यासाठी महत्त्वाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्यासाठी स्वंतत्र सल्लागार नेमण्यात येणार आहे. यात आता ऑलिम्पिक दर्जाचे तरुण तलावाचा समावेश झाला आहे. सुमारे २० कोटी रुपये खर्च करून अंबरनाथ शहरातील पूर्व भागात सर्वेक्षण क्रमांक १४९ या ठिकाणी हा तरण तलाव उभारला जाणार आहे. यात स्थापत्य बांधकाम, तलाव बांधकाम आणि तलावातील जलशुद्धीकरण प्रकल्प अशा तीन टप्प्यांचा समावेश आहे. यातील तरण तलावाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. अंबरनाथ नगरपालिकेने ११ कोटी रुपयांची तलाव बांधण्याची निविदा नुकतीच जाहीर केली. त्यामुळे लवकरच तरण तलावाच्या उभारणीला सुरुवात होणार असल्याची माहिती अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिली आहे.

Story img Loader