ठाणे : भिवंडी येथील पद्मानगर भागातील गणेश मुर्ती कारखान्यातील ५० ते ६० मुर्तींची मोडतोड करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री उघडकीस आला आहे. या घटनेनंतर भिवंडीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस तसेच लोकप्रतिनिधींनी जमावाला शांत केल्यानंतर येथील तणाव निवळला. याप्रकरणी भिंवडी शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पद्मानगर येथील भाजी बाजार परिसरात गणेश मुर्तींचा कारखाना आहे. या कारखान्यात काही गणेश मुर्ती होत्या. दोन दिवसांपूर्वी कारखान्याचे मालक राजेंद्र गादी यांनी कारखाना बंद केला होता. शुक्रवारी रात्री त्यांनी कारखाना उघडला असता, ५० ते ६० गणेश मुर्तींची मोडतोड झाल्याचे आढळून आले. या प्रकारानंतर ५०० ते ६०० नागरिक तेथे जमले.

हे ही वाचा…सर्वकार्येषु सर्वदा: होतकरू विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आर्थिक पाठबळाचे आवाहन

त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांचा फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आला. आमदार महेश चौघुले, पोलीस उपायुक्त श्रींकात परोपकारी, माजी नगरसेवक संतोष शेट्टी यांच्यासह काही नागरिकांनी जमावाला शांत केल्याने तणाव निवळला. मोडतोड झालेल्या मुर्ती वाहनांमध्ये नेऊन त्याचे वऱ्हाळ देवी तलावामध्ये विसर्जन करण्यात आले. तर मुर्ती शनिवारी पहाटे भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Story img Loader