लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : मध्य रेल्वे प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) फलाट क्रमांक १० आणि ११ च्या विस्तृतिकरणाचे काम हाती घेतले आहे. तसेच ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक पाच आणि सहाच्या रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे ३१ मे ते २ जून पर्यंत मध्ये रेल्वेने मेगाब्लॉक घोषित केला आहे. यामुळे अनेक लोकल फेऱ्या तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यातील सायंकाळच्या वेळेत रद्द होणाऱ्या लोकल फेऱ्यांच्या वेळापत्रक पुढील प्रमाणे :-

  • ४ वाजून ५० मिनिटांची (ठाणे – अंबरनाथ)
  • ४ वाजून ५४ मिनिटांची (कुर्ला – कल्याण)
  • ४ वाजून ३० मिनिटांची (सीएसएमटी – ठाणे)
  • ४ वाजून ३८ मिनिटांची (सीएसएमटी – ठाणे)
  • ५ वाजून ८ मिनिटांची (सीएसएमटी – डोंबिवली)
  • ५ वाजून ३० मिनिटांची (दादर – कल्याण)
  • ५ वाजून २४ मिनिटांची (सीएसएमटी – ठाणे)
  • ६ वाजून १५ मिनिटांची (विद्याविहार – कल्याण)
  • ५ वाजून ५७ मिनिटांची (सीएसएमटी – डोंबिवली)
  • ६ वाजून १५ मिनिटांची (परळ – कल्याण)
  • ६ वाजून ३ मिनिटांची (सीएसएमटी – ठाणे)
  • ६ वाजून २२ मिनिटांची (सीएसएमटी – कुर्ला)
  • ६ वाजून ३७ मिनिटांची (सीएसएमटी – ठाणे)
  • ७ वाजून ८ मिनिटांची (परळ – कल्याण)
  • ६ वाजून ५७ मिनिटांची (सीएसएमटी – अंबरनाथ)
  • ७ वाजून १८ मिनिटांची (सीएसएमटी – कल्याण)
  • ७ वाजून २९ मिनिटांची (सीएसएमटी – कल्याण)
  • ८ वाजून ५९ मिनिटांची (परळ – कल्याण )
  • ८ वाजून ५२ मिनिटांची (सीएसएमटी – ठाणे )
  • ९ वाजून १२ मिनिटांची (सीएसएमटी – डोंबिवली)
  • ९ वाजून ५४ मिनिटांची (सीएसएमटी – कल्याण)
  • ९ वाजून ५६ मिनिटांची (सीएसएमटी – कुर्ला )
  • १० वाजून ५४ मिनिटांची (सीएसएमटी – कुर्ला )
  • ११ वाजून ५५ मिनिटांची (सीएसएमटी – ठाणे)
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On may 31 evening local trains on the down route of central railway will be cancelled mrj