लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री रस्त्या लगत उभी असलेली बसगाडीच मद्यपीने चोरी केली. परंतु या बसगाडीचा अपघात झाल्याने चोरट्याला अटक करणे पोलिसांना शक्य झाले. परिसरात फेरफटका मारण्यासाठी त्याने ही बसगाडी चोरी केल्याची कबूली दिली. याप्रकरणी त्याच्याविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मद्यपी चालकामुळे एखाद्या गंभीर अपघाताची घटना घडली असती अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

Vishal Gawli in custody at Naupada police station thane news
विशाल गवळी नौपाडा पोलीस ठाण्यातील कोठडीत, रेल्वे मार्गे गाठले होते बुलढाणा
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
mcoca action against Chuha Gang, Pune, Chuha Gang,
पुणे : दहशत माजविणार्‍या ‘चूहा गँग’वर मोक्का कारवाई, आंबेगाव पोलिसांची कारवाई
police Pune, police at night, Pune, police news,
पुणे : रात्रीत पोलीस असतातच कोठे ? गंभीर घटनांची जबाबदारी घेणार का?
Mahabaleshwar Revenue takes strict action against unlicensed mining satara news
विनापरवाना उत्खननावर महाबळेश्वर महसूलची धडक कारवाई
Akhilesh Shukla
कल्याणमधील मारहाण प्रकरणातील आरोपी अखिलेश शुक्लासह इतर आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी
mobile theft thane loksatta news
ठाणे ते दिवा आणि एरोली भागात तीन वर्षांत सुमारे चार हजार मोबाईल चोरी, दररोज सरासरी तीन ते चार मोबाईलची चोरी
Akhilesh Shukla police
कल्याणमधील मारहाणप्रकरणी शुक्ला यांच्यासह दोन जण ताब्यात, हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांवर कारवाईचे उपायुक्तांचे संकेत

तक्रारदार हे वाहतुकदार असून त्यांची एक बसगाडी आहे. ३० डिसेंबरला त्यांनी बसगाडी वर्तकनगर येथील कोरस भागातील रस्त्याकडेला उभी केली होती. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री एका २१ वर्षीय व्यक्तीने त्यांची बसगाडी चोरी केली. ती बसगाडी त्याने घोडबंदर येथील चितळसर ते मानपाडा या रस्त्यावर आणली असता, ती एका दुभाजकला धडकली.

आणखी वाचा-जुनी डोंबिवलीतील ग्रामस्थांचा शास्त्रोक्त कचरा विल्हेवाट प्रकल्पाला विरोध

घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी त्याची चौकशी केली असता, त्याने ही बसगाडी चोरी केल्याची कबूली दिली. तसेच त्याने मद्य प्यायल्याचेही आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी वाहतुकदाराला संपर्क साधून या बाबत माहिती दिली. याप्रकरणी वाहतुकदाराच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला आहे. मद्यपीने फेरफटका मारण्यासाठी बसगाडी चोरी केल्याची कबूली दिली. याप्रकरणात त्याला अटक केली आहे.

Story img Loader