ठाणे : मुंब्रा बाह्यवळण (बायपास) मार्गाने उरण जेएनपीटीच्या दिशेने वाहतूक करणारे अवजड वाहन मंगळवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास उलटले. या अपघातामुळे मुंब्रा बाह्यवळण मार्ग, मुंबई नाशिक महामार्गावर, कळवा भागात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पोलिसांनी अवजड वाहन रस्त्याच्या बाजूला केले असले तरी वाहनांचा भार अधिक असल्याने सकाळी ९.३० वाजेनंतरही कोंडी फुटलेली नव्हती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “मोदींनी शरद पवार साहेबांना भटकती आत्मा म्हणणे हे पटते का?”, जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवार यांना सवाल

ठाणे, भिवंडी, नाशिक येथून हजारो अवजड वाहने मुंब्रा बाह्यवळण मार्गे उरण जेएनपीटीच्या दिशेने वाहतूक करत असतात. मंगळवारी पहाटेच्या सुमारास याच मार्गावरून अवजड वाहन वाहतूक करत होते. वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने अवजड वाहन रस्त्याकडेला उलटले. त्यामुळे मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीचा परिणाम मुंब्रा बाह्यवळण मार्गावरील खारेगाव टोलनाका येथील वाहतुकीवर झाला. त्यामुळे महामार्गावर खारेगाव टोलनाका ते मानकोली आणि माजिवडा नाका पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. कळवा येथील वाहतुकीवरही या कोंडीचा परिणाम झाला होता. या मार्गावरून हजारो नोकरदार नवी मुंबई, ठाण्याच्या दिशेने वाहतूक करत असतात. त्यामुळे नोकरदारांना कोंडीचा सामना करावा लागत आहे. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला केले आहे. परंतु महामार्ग आणि बाह्यवळण मार्ग अरुंद असल्याने सकाळी ९.३० वाजेनंतरही कोंडी कायम होती.