वसई विरार शहरात वाहन पार्किंगचीे मोठी समस्या निर्माण झालीे असून आता भर रस्त्यातच पार्किंग होऊ लागलीे आहे. वसईच्या मुख्य बाजारपेठेतीेल दुकानदारांनी भर रस्त्यातीेल जागा आपल्या वाहनांसाठी अडवून ठेवलीे आहे. यामुळे वाहतूकीस अडथळा तर निर्माण होतोच शिवाय पायी चालणे देखील कठीण झालेले आहे.
वसई विरार शहरात वाहनांचीे संख्या वाढत आहे. वाहन पार्किंगचीे व्यवस्था नसणे, रस्त्यांचे नियोजनाचा अभाव यामुळे या वाहनांचा वाहतुकीस अडथळा होता आहे. बेशिस्त वाहनचालकांचीे त्याला जोड असते. वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे तीे उभीे करण्याचीे मोठी समस्या उदभवत असते.
सगळ्यात मोठी अडचण ही वसई रोज रेल्वे स्थानक आणि बाजारपेठेच्या ठिकाणीे होत असते. येथीेल दुकानदारांनी आपापल्या दुकानासमोर रस्ते अडवून आपल्या वाहनांचे पार्किंग केले आहे. या दुकानदारांचीे मजल एवढय़ावर गेलीे आहे की त्यांनी रस्त्याच्या मधोमध अतिक्रमण करून तीे जागा आपल्या वाहनांसाठी अडवून ठेवलीे आहे. काही मोठय़ा शोरूम मालकांनी दोरी बांधून रस्ता अडवला आहे तर काही ठिकाणीे झाडांच्या कुंडय़ा ठेवून रस्ता अडवला गेला आहे. एवढे असूनही वाहतूक पोलीस किंवा महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे त्याकडे लक्ष गेलेले नाही. अशाप्रकारे बेकायदेशीररित्या रस्ता अडविल्याने वाहतुकीला अडथळा होत असून त्या रस्त्यावरून पायी चालणे देखील कठीण झालेले आहे. रस्ता आपल्याच मालकीचा असल्यासारखे हा रस्ता अडवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बेवारस वाहने कुणाचीे?
वसईच्या रस्त्यावर अनेक ठिकाणीे बेवारस वाहने उभीे करण्यात आलीे आहेत. ही वाहने अद्याप हटविलीे गेलेलीे नाहीत. या वाहनांमुळे अडथळा तर होतोच त्याशिवाय सुरक्षेलाही मोठा धोका उत्पन्न होत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On road parking at vasai virar