ठाणे: महापालिका क्षेत्रात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी डायघर येथे कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प उभारण्यापाठोपाठ आता पालिकेने शहराच्या विविध भागात कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारणीवर लक्ष केंद्रीत केले आहे. कोलशेत आणि गायमुख भागात कचऱ्यापासून खतनिर्मीतीचा प्रकल्प उभारणीची कामे सुरू आहेत. या प्रकल्पामध्ये दररोज १३० टन कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. यातील कोलशेतचा प्रकल्प येत्या १५ दिवसांत तर, गायमुखचा प्रकल्प दोन ते तीन महिन्यात कार्यान्वित होईल. तसेच या प्रकल्पांमुळे कचऱ्याची परिसरातच विल्हेवाट लावली जाणार असल्याने कचरा वाहतूक खर्चात बचत होईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज एक हजार टनाच्या आसपास कचरा निर्माण होतो. त्यापैकी ४५० टन कचरा हा ओला कचरा असतो. ठाणे महापालिकेची स्वत:ची कचराभुमी नाही. यामुळे दिवा, त्यानंतर शहराबाहेर म्हणजेच भांडार्ली येथे कचरा टाकला जात होता. अखेर पालिकेने डायघर भागात कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प उभारून तिथे शहरातील कचरा नेण्यास सुरूवात केली आहे. असे असले तरी शहरात दररोज शंभर किलो कचरा निर्माण करणारी गृहसंकुले आणि आस्थापनांनी कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारावेत, असे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. त्याचबरोबर शहराच्या विविध भागात छोटे-छोटे कचरा विल्हेवाट प्रकल्प पालिकेकडून उभारण्यात येत आहेत. घोडबंदर भागातील हिरानंदानी इस्टेट भागात ३५ टन कचऱ्यावर प्रक्रीया केली जात आहे. उथळसर येथे १० टन, कौसा येथे १० टन, कळवा रुग्णालय येथे २५ टन कचरा विल्हेवाट प्रकल्प असून याठिकाणी कचऱ्यापासून खत निर्मीिती केली जात आहे.

shilphata road cash 5 crore rupees seized
कल्याण ग्रामीणमधील विधानसभा मतदारसंघात शिळफाटा येथे वाहनातून पाच कोटी जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
traffic congestion, Parking problem APMC navi mumbai double parking, trucks
एपीएमसीतील पार्किंग समस्या जटिल, ट्रकच्या दुहेरी पार्किंगमुळे वाहतूक कोंडी
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
Garbage piles up in various places in the city due to the recruitment of election workers Mumbai news
शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग; निवडणूक कामातील कामगारांच्या नियुक्त्यांमुळे कचरा व्यवस्थापनाची घडी विस्कटली
The Meteorological Department has given the forecast of rain in the state of Maharashtra
थंडी सुरू झाली नाही की आता पाऊस येऊन धडकणार…राज्यातील या भागात…

हेही वाचा… नाताळनिमित्त बाजारपेठा सजल्या

महापालिका घनकचरा विभागाच्या माध्यमातून कोलशेत परिसरात ३० टनचा कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प पुढील १५ दिवसांत सुरू करण्यात येईल, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. गायमुख भागात १०० टन कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यात येत आहे. याठिकाणी ओल्या कचऱ्यावर प्रक्रीया करून खत निर्मीती केली जाणार आहे. हा प्रकल्प सुद्धा पुढील दोन ते तीन महिन्यात कार्यान्वित केला जाईल असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. त्याचप्रमाणे शहराच्या इतर भागातही अशाचप्रकारे छोटे प्रकल्प उभारण्यावर पालिकेने लक्ष केंद्रीत केले आहे. या प्रकल्पांमुळे परिसरातील कचऱ्याची तिथेच विल्हेवाट लावली जाणार असल्याने कचरा वाहतूक खर्चात बचत होणार आहे.