ठाणे: साडे तीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसरा सणाच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल असतो. नेमकी हि बाब लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनी यंदाही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध वस्तुंवर सवलती जाहीर केल्या आहेत. घर, फर्निचर, दागिने, इलेक्टाॅनिक उपकरणे, कपडे, वाहने यावर दुकानदारांनी सवलतींचा वर्षाव केला असून यामुळे दुकानांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होताना दिसून येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात असते. बाजारात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. या दिवशी खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल असतो. ग्राहकांना आकर्षित करत खरेदीसाठी वळवण्याकरिता विविध प्रकारच्या सवलतींचा वर्षाव विक्रेत्याकडून करण्यात येतो. यंदाही हे चित्र दिसून येते. वाहन खरेदीसाठी आधी नोंदणी करावी लागते. यामुळे वाहन विक्रिच्या दुकानांमध्ये नागरिकांची नोंदणीसाठी गर्दी होत आहे. नाविण्यपुर्ण आकर्षक दागिन्यांची दसऱ्याच्या दिवशी खरेदी केली जाते. परंतु त्यासाठी दोन दिवस आधीपासूनच दागिन्यांची पसंती करण्यासाठी सराफांच्या दुकानांमध्ये गर्दी झाली होती. आज प्रत्यक्ष खरेदीसाठी गर्दी होत आहे. यामध्ये सोन्याच्या दागिन्याच्या घडणावळीवर १५ टक्के, २५ टक्के सवलती देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा… ठाण्यात आज ५९५ देवी मुर्तींचे विसर्जन

सोन्याच्या दागिन्याच्या खरेदीवर दुप्पट वजनाची चांदी भेट अशाप्रकारे आकर्षक सवलती देण्यात आल्या आहेत. याशिवाय, कपडे, इलेक्ट्राॅनिक उपकरणे विक्रिच्या दुकानदारांनी विविध सवलती जाहीर केल्या आहेत. साड्यांच्या दुकानामध्ये कूपन पद्धतीने खरेदी करण्याची संधी देण्यात आली आहे. जाहिराती देण्यात येणाऱ्या कूपनच्या आधारे ग्राहकांना खरेदीचा आनंद लुटता येणार आहे. लहान मुलांचे कपडे, विविध साड्या यांच्या दुकानामध्ये किमतीमध्ये सवलती उपलब्ध आहेत. वाहन खरेदीवर अगदी कमी किमतीत आपल्या आवडती गाडी ग्राहकांना खरेदी करता यावी यासाठी सवलतींचा गालीचा अंथरला आहे. ठाणे शहर तसेच इतर शहरातील परिसरात घर खरेदीसाठी ग्राहकांना विविध सवलती देण्यात आल्या आहेत. व्यावसायिकांनी वेगवेगळ्या योजनाेच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यात कर्ज सुविधा, दसऱ्यानिमित्त खास सवलत, गिफ्ट व्हाऊचर्स, सोडत आदींचा समावेश आहे.

प्रत्येक सणात खाद्य पदार्थांची रेलचेल सुरू असते. दसरा सणाचा गोडवा वाढवण्यासाठी मिठाईची दुकाने सजली आहेत. गोड पदार्थ खरेदी साठी नागरिक मिठाईच्या दुकानात गर्दी करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On the occasion of dussehra in thane traders have announced discounts on various items dvr