ठाणे: कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्ताने साजऱ्या केल्या जाणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून ठाणे महापालिकेने निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनामुळे ठाणेकर रसिकांना राज्याच्या विविध भागांतील कवींच्या काव्य सादरीकरणाचा आस्वाद घेता येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोमवार, २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. हा काव्यसोहळा विनामूल्य असणार आहे. ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या अध्यक्षतेखाली या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. निमंत्रितांच्या कवी संमेलनात प्रा. डॉ. प्रज्ञा पवार, ठाण्याचे सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, महेश केळुसकर, अशोक बागवे, विजय चोरमारे, संजीवनी तडेगावकर, आप्पा ठाकूर, अनंत राऊत, अशोक कोतवाल, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी असे कवी सहभागी होणार आहेत. तसेच, महेश केळुसकर आणि विजय चोरमारे या संमेलनाचे सूत्रसंचालन करणार आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On the occasion of marathi language day event organized by the thane municipal corporation ysh