राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे एकेकाळचे अत्यंत निकटवर्तीय असणारे नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण शहरभर शुभेच्छा फलक लागले होते, पण कळवा-मुंब्रा मतदारसंघात लागलेल्या शुभेच्छा फलकांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. असे असतानाच त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मुशायरा कार्यक्रमाला हजेरी लावत मुल्ला हे आमदारकीसाठी परफेक्ट मटेरियल असल्याने त्यांचे पक्षात स्वागत करू, असे सुचक विधान बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केले होते. यामुळे मुल्ला यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बाळासाहेबांच्या शिवसेनेने आव्हाड यांना त्यांच्या मतदारसंघात घेरण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ठाणे महापालिकेची राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गटनेते नजीब मुल्ला हे अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. आव्हाड यांनी कळवा-मुंब्रा मतदारसंघातून २००९ मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुक लढविली. या निवडणुकीत आव्हाड यांच्या झालेल्या विजयात मुल्ला यांचे योगदान होते. मुल्ला हे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते. परंतु, गेल्या काही वर्षांत त्यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे चित्र आहे. याच संधीचा फायदा घेऊन मुल्ला यांच्या माध्यमातून आव्हाड यांना घेरण्याचा प्रयत्न बाळासाहेबांची शिवसेनेने केल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा – तात्पुरत्या वीज जोडणीतून बेकायदा इमारतींमध्ये कायमस्वरुपी वीज पुरवठा?, घर खरेदीदार सदनिकाधारकांची फसवणूक

नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण शहरभर शुभेच्छा फलक लागले होते. पण, कळवा-मुंब्रा मतदारसंघात लागलेले शुभेच्छा फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या शुभेच्छा फलकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचे फोटो असल्याने अनेक उलट सुलट चर्चांना उधाण आले होते.

हेही वाचा – बदलापूर : शिक्षिकेचे मंगळसुत्र पळवले दुचाकीवरून आलेल्या दोघांचे कृत्य, गुन्हा दाखल

नजीब मुल्ला हे बाळासाहेबांची शिवसेनेत जाणार का, अशा चर्चा रंगल्या होत्या. असे असतानाच मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मुशायरा कार्यक्रमात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्यासमवेत भाजपाच्या काही माजी नगरसेवकांनी हजेरी लावून त्यांनी मुल्ला यांना आमदार होण्याच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात ” कामयाबी के सफर मे मुश्किले तो आयेगीही, चलते रेहना की कदम कभी रुकने न पाये, मंजिल तो मंजिल है एकदिन तो आयेगीही ” असा मुशायरा सादर करून नजीब हे आमदारकीसाठी परफेक्ट मटेरियल असून ते आमच्या पक्षात येणार असतील तर त्यांचे नक्कीच स्वागत करू, असे वक्तव्य म्हस्के यांनी केले होते. त्यामुळे, बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाने आपला मोर्चा कळवा, मुंब्रा या मतदारसंघाकडे वळवून आमदार जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्या एकेकाळचे निकटवर्तीय मानले जाणारे मुल्ला यांच्या माध्यमातून शह देण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा शहरभर सुरू झाली आहे.