डोंबिवली – नववर्ष स्वागत यात्रेचे औचित्य साधून श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवनावरील विविध प्रकारचे नृत्याविष्कार २१ मार्च रोजी आयोजित करण्यात आले आहेत. डोंबिवलीतील २६ प्रथितयश नृत्य संस्थांमधील २८० नृत्यांगनांकडून हे अविष्कार सादर केले जाणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवली पूर्वेतील आयरे रोड रस्त्यावरील चैत्र पाडव्याच्या पूर्वसंध्येला चंद्रकांत पाटकर शाळेच्या पटांगणात संध्याकाळी सात वाजता हे नृत्याविष्कार सादर केले जाणार आहेत. २८० नृत्यांगना या शहराच्या विविध भागांतील नृत्य शाळेतील प्रशिक्षित नृत्यांगना आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

हेही वाचा – डोंबिवलीत दहशत माजविणाऱ्या फेरीवाल्यांवर गुन्हे

हेही वाचा – ठाणे पोलिसांकडून साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची चौकशी

शोभा यात्रेसाठी काश्मीरमधून काही विद्यार्थिनी डोंबिवलीत येणार आहेत. त्यांची पारंपारिक नृत्ये यावेळी सादर केली जाणार आहेत. दोन वर्षांपूर्वी काश्मीर येथील मुली डोंबिवलीतील शोभा यात्रेत सहभागी झाल्या होत्या. काश्मीरी मुलींच्या शैक्षणिक, सामाजिक विकासासाठी कार्यरत असलेल्या हम चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुनील देशपांडे, कार्यकर्ते मनोज नशिराबादकर यांच्या नेतृत्वाखाली या मुली डोंबिवलीत येत आहेत. यावेळी आदिती सेवा प्रतिष्ठानच्या संस्थापिका पंकजा वल्ली याही वसतिगृहातील मुलींसह शोभायात्रेत सहभागी होणार आहेत. एकावेळी २८० नृत्यांगना एका पटांगणात एकावेळी येण्याचा डोंबिवलीतील हा पहिलाच आणि दुर्मिळ योग आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On the occasion of new year welcome yatra shri ganesh mandir sansthan organized various dance performances on the life of lord sri ramachandra ssb