कल्याण : उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या ठाणे विभागातर्फे गुरुवारी सकाळी कल्याण पूर्वेतील नांदिवली तर्फ गावातील वाहन तपासणी केंद्रावर ४०० वाहन चालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित या कार्यक्रमात उपप्रादेशिक परिवहन विभागाचे ठाणे येथील अधिकारी सहभागी झाले होते. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने हा आरोग्य तपासणी कार्यक्रम पार पडला. आरोग्य विभागाचे तज्ज्ञ डाॅक्टर या उपक्रमात सहभागी झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> कल्याण येथील गावात महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर दुधकर कुटुंबीयांचा प्राणघातक हल्ला

वाहन चालकाचे कर्तव्य हे तणावाचे असते. राज्यात, देशात अनेक वाहन चालक सतत प्रवास करत असतात. एकदा वाहन चालविण्यास घेतले की वाहन चालकाला इच्छित स्थळी माल पोहचविणे गरजेचे असते. अशा काळात वारा, पाऊस, थंडी अशा वातावरणीय बदलाची तो पर्वा करत नाही. अनेक वेळा अपघात, वाहन कोंडी अशा संकटाचा सामना वाहन चालकाला करावा लागतो. सतत व्यस्त असलेल्या चालकाला अनेक वेळा आपल्या आरोग्य, दुखण्याकडे लक्ष देण्यास वेळ नसतो. वाहन चालक हाही व्यवस्थेचा एक महत्वाचा भाग आहे. हे ओळखून नांदिवली वाहन तळावर सक्षमता प्रमाणपत्र घेण्यासाठी आलेल्या ठाणे आरटीओ अंतर्गत वाहन चालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये काही चालकांना रक्तदाब, मधुमेह, मोतिबिंदू आढळून आले. चालकांना धर्नुवाताचे लसीकरण करण्यात आले.

हेही वाचा >>> कल्याणमध्ये आजपासून आगरी-कोळी, मालवणी महोत्सव

अनेक वेळा प्रवासात लोखंडी पत्रा किंवा काही लागते. त्याचा त्रास नंतर चालकांना होतो, म्हणून हे लसीकरण करण्यात आले, असे ठाणे विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी सांगितले. यावेळी वाहन चालकांनी स्वतासह आपल्या कुटुंबाची घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले, असे मोटार वाहन निरीक्षक फारुक काझी यांनी सांगितले. या कार्यक्रमाला मोटार वाहन निरीक्षक कोटकर, विक्रम पाटील, वाघमारे, खरे उपस्थित होते.

वाहतूक पोलीस तपासणी

डोंबिवली वाहतूक शाखा आणि एम्स रुग्णालयातर्फे गुरुवारी वाहतूक पोलीस, रिक्षा चालकांची आरोग्य तपासणी डोंबिवली वाहतूक शाखा पटांगणात करण्यात आली. रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी एम्स रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डाॅ. मिलिंद शिरोडकर, साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, ॲड. शिरीष देशपांडे, रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सचीन सांडभोर, सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया कुलकर्णी उपस्थित होते. वाहतूक नियम पालन करणारी शपथ यावेळी रिक्षा चालक, वाहन चालक यांना देण्यात आली.